Join us  

Manba Finance IPO: मार्केटमध्ये फायनान्स सेक्टरचा दबदबा! बजाजनंतर 'या' कंपनीच्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 9:33 AM

Manba Finance IPO: बजाज हाउसिंग फायनान्सनंतर मनबा फायनान्स कंपनीचाही शेअर मार्केटमध्ये जलवा पाहायला मिळत आहे. आयपीओ घेण्यासाठी गुंतवणूकदार चांगला प्रतिसाद देत आहेत.

Manba Finance IPO : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार आपल्या ऐतिहासिक स्तरावर व्यवहार करत आहे. यामध्ये फायनान्स सेक्टरचा दबदबा पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या बजजा फायनान्सच्या आयपीओने बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला. शेअर्स धारकांना जवळपास १३४ टक्क्यापेक्षा जास्तीचे परतावा बजाज फायनानन्सच्या शेअर्सने दिलेत. परिणामी आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO लिस्ट झाल्यानंतर गुंतवणूकदारांनीशेअर बाजारात मनबा फायनान्स लिमिटेडचा IPO लगेच घ्यायला सुरुवात केली. IPO मध्ये अर्जाच्या शेवटच्या दिवशी २२४.०५ पेक्षा जास्त वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. हा स्टॉक ग्रे मार्केटमध्येही तेजीत दिसत आहे.

IPO वर सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांनी उड्या टाकल्या. मनबा फायनान्स लिमिटेड ही एक नॉन बँकींग फायनान्स कंपनी आहे. जी प्रामुख्याने दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी कर्ज देते. कंपनीचा IPO २३ सप्टेंबर २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता.

कंपनी IPO द्वारे १,२५,७०,००० नवीन शेअर्स जारी करणारमनबा फायनान्स लिमिटेड या IPO अंतर्गत १५०.८४ कोटी रुपयांचे एकूण १,२५,७०,००० नवीन शेअर जारी करणार आहे. यामध्ये ओएफएसचा समावेश नाही. आज सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी बोली लावणारे गुंतवणूकदार IPO वर तुटून पडले. मनबा फायनान्स लिमिटेडच्या IPO ला एकूण २२३.१२ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. IPO मधून येणारा पैसा कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कामकाजासाठी वापरला जाणार आहे.

मनबा फायनान्स कधी लिस्ट होणार?गुरुवारी (२६ सप्टेंबर) गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाईल. त्यानंतर शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा होतील. पुढील आठवड्यात, ३० सप्टेंबरला कंपनी भारतीय शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख एक्सचेंज, BSE आणि NSE वर लिस्टिंग होऊ शकते.

किती आहे GMP?गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे ग्रे मार्केटमध्येही कंपनीच्या शेअर्सना प्रचंड मागणी दिसून येत आहे. बुधवारी २५ सप्टेंबरला मनबा फायनान्सचे शेअर्स ५८ रुपयांच्या प्रीमियमसह म्हणजेच ४८.३३ टक्के ट्रेड करत होते. लिस्टिंग होईपर्यंत मनबा फायनान्स शेअर्सच्या GMP किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या IPO ची लिस्टिंग सुमारे १७८ रुपये अपेक्षित आहे.

कंपनी काय काम करते?मुंबईस्थित असलेल्या मनबा फायनान्स लिमिटेड कंपनीचा कारभर देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये आहे. ही कंपनी दुचाकी, तीनचाकी वाहन घेण्यासाठी कर्जपुरवठा करते. तसेच छोटे व्यवसायिकांनाही वित्तपुरवठा करण्याचे काम मनबा करते. मनबा फायनान्स लिमिटेड विविध बँका आणि वित्तीय संस्थांसोबतही भागीदारी करत आहे.  ही कंपनी विशेषकरुन पगारी लोकांना कर्ज देण्यास प्राधन्यदेते. त्यामुळे कर्जाची परतफेडची टक्केवारी चांगली आहे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक