Manba Finance IPO : बजाज फायनान्सच्या आयपीओतून पैसे कमावण्याची संधी हुकली असेल तर थांबा. कारण, आता अशीच एक संधी पुन्हा चालून येत आहे. आजच्या मेनबोर्ड लिस्टिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कंपनीत पैसे गुंतवण्याची संधी मिळत आहे. मनबा फायनान्सचा आयपीओ आजपासून सुरू झाला आहे. हा आयपीओ आजपासून २५ सप्टेंबरपर्यंत खुला राहणार आहे. तुम्हाला जर या कंपनीत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल. तर त्याआधी कंपनीचा पूर्वइतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Manba Finance IPO बाबत महत्त्वाची माहिती
- मनबा फायनान्स IPO ची फेस व्हॅल्यू १० रुपये प्रति शेअर असून त्याच्या शेअर्सची किंमत ११४-१२० रुपये प्रति शेअर आहे.
- याची लॉट साइज १२५ शेअर्स आहे. त्यानुसार गुंतवणूकदारांना एकूण १५,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. साधारणपणे 14,000 रुपये किंवा तत्सम रक्कम IPO मध्ये गुंतवावी लागणार आहे.
- २६ सप्टेंबरला या शेअर्सचे वाटप होणार आहे. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये शेअर्स वाटप करण्यात आले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर गुंतवणूकदारांचे पैसे २७ सप्टेंबरला रिफंड केले जातील.
- मनबा फायनान्स आयपीओच्या माध्यमातून कंपनी १२,५७०,००० शेअर्स बाजारात आणत आहे. याची एकूण मूल्य १५०.८४ कोटी इतके आहे.
- हा इश्यू पूर्णपणे ताज्या शेअर्सचा IPO आहे. IPO शेअर्सचे वाटप २६ सप्टेंबर २०२४ रोजी होईल.
- या आयपीओच्या शेअर्सची लिस्टिंग ३० सप्टेंबरला होऊ शकते. याची लिस्टिंग BSE आणि NSE दोन्हीवर होईल. ३० सप्टेंबर ही तारीख तात्पुरती असून यात बदल होऊ शकतो.
मनबा फायनान्स IPO चे GMP काय आहे?
आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर मनबा फायनान्स आयपीओचा जीएमपी ६० रुपयांवर सुरू आहे. या आधारे मनबा फायनान्स IPO ची संभाव्य लिस्टिंग १८० रुपये प्रति शेअर असू शकते. (रु. 120 + रु 60 GMP) याद्वारे, कंपनी ५० टक्के प्रीमियमवर लिस्टिंग केली जाऊ शकते.
मनबा फायनान्स काय करते?
मनबा फायनान्स लिमिटेड ही नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC-BL) असून १९९८ साली याची स्थापना झाली. ही कंपनी प्रामुख्याने दुचाकी, तीन-चाकी, इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक 3-व्हीलरसाठी वित्तपुरवठा करते. याशिवाय, कंपनी जुन्या वापरलेल्या कार, लघु व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्ज देते.
(Disclaimer- यामध्ये आयपीओची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)