Join us  

Manba Finance IPO : ७ दिवसात १५ हजारांच्या गुंतवणुकीवर मिळेल ७५०० रुपयांचा बंपर नफा! या IPO चा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 2:34 PM

Manba Finance IPO GMP : मनबा फायनान्सचा आयपीओ २३ सप्टेंबरला लाँच होत आहे. मात्र, त्याआधीच ग्रे मार्केटमध्ये IPO शेअर्स ५०% प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत.

Manba Finance IPO GMP : आयपीओ म्हणजे झटपट पैसे कमावण्याची संधी असते. जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी संधी चालून आली आहे. मनबा फायनान्सचा IPO उद्या म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी उघडणार आहे. या इश्यूच्या शेअर्ससाठी तुम्ही २५ सप्टेंबरपर्यंत बोली लावू शकता. 30 सप्टेंबरला कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर सूचीबद्ध केले जातील. मनबा फायनान्सच्या 150.84 कोटी रुपयांच्या IPO ला ग्रे मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये हा शेअर 50 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत. अप्पर प्राइस बँडनुसार, या IPO मध्ये किमान 15,000 रुपये गुंतवावे लागतील.

काय आहे मनबा फायनान्सचा इतिहास?१९९८ मध्ये स्थापन झालेली मनाबा फायनान्स लिमिटेड ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे. ही कंपनी नवीन दुचाकी, तीन-चाकी, इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर, सेकंड हँड कार, स्मॉल बिजनेस लोन आणि पर्सनल लोन ऑफर करते. या आर्थिक वर्षात मनबा फायनान्स लिमिटेडच्या महसुलात ४४% वाढ झाली आहे, तर PAT ९०% ने वाढली आहे. आर्थिक वर्ष 24 मध्ये, कंपनीचा महसूल १९१.६३ कोटी रुपये होता. तर करानंतरचा नफा ३१.४२ कोटी रुपये होता.

प्राईस बँड ११४ ते १२० रुपयेमनबा फायनान्स या इश्यूसाठी  १५०.८४ कोटी किमतीचे १२,५७०,००० फ्रेश शेअर जारी करेल. या इश्यूत विक्रीसाठी कोणतीही ऑफर नाही. म्हणजे कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार एकही शेअर विकत नाहीत. मनबा फायनान्सने इश्यूची किंमत ११४ ते १२० निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच १२५ शेअर्ससाठी बोली लावू शकतात.

किमान १५,००० रुपये गुंतवणूकमनबा फायनान्स IPO ची किंमत ११४-१२० रुपये आहे. जर एखाद्या किरकोळ गुंतवणूकदाराने IPO च्या वरच्या प्राइस बँडवर १२० वर 1 लॉटसाठी अर्ज केला तर त्याला किमान १५,००० गुंतवावे लागतील. त्याचप्रमाणे, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटसाठी म्हणजेच १६२५ शेअर्ससाठी अर्ज करू शकतो. यासाठी अप्पर प्राइस बँडनुसार १ लाख ९५ हजार रुपये खर्च करावे लागतील.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के राखीवमनबा फायनान्स IPO पैकी 50% पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) राखीव आहे. याशिवाय, 35% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे तर उर्वरित 15% हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव आहे.

मनाबा फायनान्स आयपीओ जीएमपीग्रे मार्केटमध्ये, मनबा फायनान्स IPO चे अनलिस्टेड शेअर्स 50 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत. ग्रे मार्केटवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाईटनुसार  (IPOwatch.in) नुसार, आज Manba Finance IPO शेअर्स 60 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत. वरच्या बँडच्या किमतीनुसार, मनबा फायनान्सचे शेअर्स १८० रुपयांच्या वर लिस्ट केले जाऊ शकतात.

Disclaimer : आयपीओमध्ये केलेली गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. तुम्हाला यापैकी कुठेही गुंतवणूक करायची असेल तर  तज्ञ गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी लोकमत जबाबदार राहणार नाही.