Join us

मार्केट A 2 Z : संधी सोडाल तर रिटर्न कसे मिळवाल?

By पुष्कर कुलकर्णी | Published: October 10, 2022 9:25 AM

आता या भागात पाहुयात B पासून सुरू होणाऱ्या फंडामेंटल चांगल्या असणाऱ्या काही कंपन्यांच्या शेअर्सविषयी. 

मार्केट A 2 Z  या नवीन मालिकेचे वाचकांनी उस्फूर्त स्वागत केले. दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या विशेतः तरुण गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करावे, हा या मालिकेचा उद्देश आहे. मागील भागात A या अक्षरापासून सुरू होणाऱ्या काही कंपन्यांच्या शेअर्सविषयी आपण पहिले. आता या भागात पाहुयात B पासून सुरू होणाऱ्या फंडामेंटल चांगल्या असणाऱ्या काही कंपन्यांच्या शेअर्सविषयी. 

बाटा इंडिया  चप्पल - बूट म्हटले की पहिले नाव मनात येते ते म्हणजे ‘बाटा’. १,७००च्या वर स्वतःची रिटेल आउटलेट चेन असणारी कंपनी आपल्या विविध ब्रॅण्ड्ससाठी सर्वपरिचित आहे. यामध्ये बाटा रेड लेबल, हश पपीज, पॉवर, नॉर्थ स्टार आदी ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. दैनंदिन आवश्यक आणि गरजेची वस्तू म्हणून चप्पल, बूट आदी वस्तूंकडे पाहता या कंपनीचे भविष्य उज्ज्वल दिसते.

फेस व्हॅल्यू     : रुपये ५/-सध्याचा भाव  : १,७८४ रुपयेमार्केट कॅप     : २३ हजार कोटी रुपये बोनस शेअर्स  : १९८७ पूर्वी ३ वेळाशेअर स्प्लिट  : १ : १ या प्रमाणात २०१५ मध्येरिटर्न्स           : गेल्या १० वर्षांत चार पट परतावा भाव पातळी  : वार्षिक हाय २,२६२ व लो १,६०७डिव्हिडंड       : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.भविष्यात संधी :  बोनस आणि शेअर स्प्लिटची संधी असून शेअरचा भावही उत्तम वाढू शकतो.

भारत फोर्जवाहन व इतर उद्योगांना अल्युमिनियम कास्टिंग, इलेक्ट्रिक वाहनांना पार्टस, थर्मल, हायड्रो आणि विंड इलेक्ट्रीकल यांना आवश्यक उत्पादने आणि पेट्रेल-डिझेल वाहनांना आवश्यक गिअर फोर्जिंग उत्पादने बनविणारी कंपनी.फेस व्हॅल्यू     : रुपये २/-सध्याचा भाव : ७६७ रुपये मार्केट कॅप     : ३५,६०० कोटी रुपये बोनस शेअर्स  : चार वेळा. मागील बोनस एकास एक या प्रमाणात २०१७ मध्ये.शेअर स्प्लिट   : १/५ या प्रमाणात २००५ मध्येरिटर्न्स            : गेल्या १० वर्षांत गुंतवणूकदारांना साडेपाच पट रिटर्न्स मिळाले आहेत. डिव्हिडंड        : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.भाव पातळी    : वार्षिक हाय ८४८ व लो ५९५

भविष्यात संधी :  कोर औद्योगिक क्षेत्रांत व्यवसाय असल्याने त्यात वृद्धीची उत्तम संधी. बोनस आणि एकदा शेअर स्प्लिटची संधी आहेच.

मार्केट A 2 Z

बजाज फायनान्स  नॉन बँकिंग फायनान्शियल सेक्टरमध्ये मोडणारी दर्जेदार कंपनी. कन्झ्युमर ड्युरेबल्स, लाईफ स्टाईल प्रॉडक्ट्स, पर्सनल गॅझेट्स, दुचाकी तसेच तीन चाकी वाहनांना फायनान्स करणे हा या कंपनीचा प्रमुख व्यवसाय आहे.फेस व्हॅल्यू     : रुपये २/-सध्याचा भाव : ७,३४५ रुपयेमार्केट कॅप     : रुपये ४ लाख ३५ हजार कोटीबोनस शेअर्स  : २०१६ मध्ये १:१ या प्रमाणातशेअर स्प्लिट   : २०१६ मध्ये १:५ या प्रमाणातरिटर्न्स            : गेल्या १० वर्षांत ५६ पट परतावा डिव्हिडंड        : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.भाव पातळी    : वार्षिक हाय रु ८,०५० लो ५,२२०/

भविष्यात संधी : उत्तम संधी. कंपनीच्या कामगिरीवर शेअरचा भाव भविष्यात अनेक पटींनी वाढू शकतो. शेअर स्प्लिट आणि बोनस शेअर्स याची संधी आहेच. बजाज फायनान्सचेच जुळे भावंडं म्हणजे बजाज फिनसर्व. या कंपनीने नुकतेच शेअर स्प्लिट करून बोनसही दिला आहे. यातील गुंतवणूकही भविष्यात फायद्याची ठरू शकते.

गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची नावे बजाज ऑटो । बजाज इलेक्ट्रिकल्स । बजाज होल्डिंग । बाळकृष्ण इंडस्ट्रीज । भारत इलेक्ट्रॉनिकस । बॉश इंडिया । भारत पेट्रोलियम । ब्रिटानिया इंडस्ट्रीज अशा इतरही उत्तम कंपन्या शेअर बाजारात लिस्ट आहेत. यातील गुंतवणूकही भविष्यात उत्तम रिटर्न्स देण्याची क्षमता राखते.

टीप : हे सदर गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजार