Join us  

मार्केट A 2 Z: शेअर बाजारात संयम ठेवल्यास मिळेल आर्थिक सुखाचा आनंद 

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 05, 2022 10:00 AM

आर्थिक सुखी होण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदार राहावे. आज इंग्रजी अक्षर ‘जे’ पासून सुरू होणाऱ्या काही चांगल्या कंपन्यांविषयी...

पुष्कर कुलकर्णी

एखादा उत्तम शेअर आपण घेतला आणि काही कारणांनी तो जर खाली आला तर आपल्याला क्लेश होत असतात. निर्णय चुकला का असे वाटते. परंतु आपल्याकडे जर होल्डिंग कपॅसिटी असेल आणि पुढील काही महिने किंवा एक-दोन वर्षं जर तो शेअर आपल्याकडे ठेवला तर त्याचा बाजारभाव खरेदी भावापेक्षा वर आलेला दिसतो. अशा वेळेस आपला निर्णय चुकला नाही असे निश्चितच वाटत असते आणि मन सुखी होत असते. जसे म्हणतात की, यशाची पहिली पायरी अपयश असते तसेच बाजारातील पहिली पायरी कदाचित दुःख आणि क्लेश असू शकते. आर्थिक सुखी होण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदार राहावे. आज इंग्रजी अक्षर ‘जे’ पासून सुरू होणाऱ्या काही चांगल्या कंपन्यांविषयी...

जे के सिमेंट (JKCEMENT) कन्स्ट्रक्शन मटेरियल सेगमेंटमधील एक चांगली कंपनी. सिमेंट आणि त्या अनुषंगिक इतर उत्पादने बनविणे आणि विक्री हा प्रमुख व्यवसाय.  जे के सुपर या ब्रँडने सिमेंट तसेच व्हाइट सिमेंट, पुट्टी अशी अनेक उत्पादने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत...फेस व्हॅल्यू : रु. १०/- प्रतिशेअरसध्याचा भाव : रु. ३,२३६/- प्रतिशेअरमार्केट कॅप : रु. २५ हजार कोटीभाव पातळी : वार्षिक हाय रु. ३६६०/- आणि  लो रु. २००३ /-बोनस शेअर्स : अद्याप नाहीशेअर स्प्लिट :  अद्याप नाहीडिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तब्बल दहा पट रिटर्न्स दिले आहेत.भविष्यात संधी : उत्तम. कारण भारतात कन्स्ट्रक्शन व्यवसाय वाढत आहे. केंद्र सरकारसुद्धा पायाभूत क्षेत्रांत बराच खर्च करीत आहे. यामुळे कंपनीस चांगले भवितव्य असू शकते. याचबरोबर स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची ही संधी आहे. शेअर सध्या ओव्हर बॉट झोनमध्ये जात आहे. करेक्शन येऊ शकते. एंट्रीसाठी थोडा अवधी घेऊन भाव खाली येण्याची वाट पाहावी.

जे एस डब्ल्यू स्टील लि.  (JSWSTEEL)    जिंदाल उद्योगसमूहाची धातू क्षेत्रातील एक कंपनी. अलॉय स्टील उत्पादने, हॉट आणि कोल्ड रोल कॉईल उत्पादन आणि विक्री हा प्रमुख व्यवसाय भारतात आणि जगभरात काही देशांमध्ये सुरू आहे.फेस व्हॅल्यू : रु. १/- प्रतिशेअरसध्याचा भाव : रु. ७४३/- प्रतिशेअरमार्केट कॅप : रु. १ लाख ८१ हजार कोटीभाव पातळी  : वार्षिक हाय रु ७९०/- व लो - ५२० /-बोनस शेअर्स : अद्याप नाहीशेअर स्प्लिट : १:१० या प्रमाणात जाने २०१७ मध्येरिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तब्बल नऊ पट रिटर्न्स दिले आहेत.डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.भविष्यात संधी : उत्तम राहील. स्टील हा धातू सर्वस्तरावर आवश्यक असून याची मागणी कायम वाढत जाणारी असते. सध्या शेअरचा भाव उच्चतम् पातळीवरून खाली येत आहे. एंट्रीसाठी थोडी अजून करेक्शनची वाट पाहावी. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर उत्तम राहील.

ज्युबिलंट फूडवर्क्स लि. (JUBLFOOD) असे फार कमी लोक असतील की ज्यांनी आतापर्यंत डॉमिनोज पिझ्झा खाल्ला नसेल. मुले व विशेषतः तरुण वर्गांत पिझ्झा क्रेज जरा जास्तच असते, या कंपनीची भारत आणि आशियाई देशांत ३५० शहरांत डॉमिनोज या ब्रँडने आउटलेट्स आहेत. स्वतःची आणि डिलिव्हरी पार्टनरमार्फत पिझ्झा घरोघरी पोचविण्याची व्यवस्था कंपनी करते.फेस व्हॅल्यू : रु. २/-सध्याचा भाव : रु. ५४८/-मार्केट कॅप :  ३६ हजार कोटी रुपये.भाव पातळी : वार्षिक हाय रु. ८०६/- आणि  लो - ४५१/-बोनस शेअर्स : १:१ या प्रमाणात जून २०१८ मध्येशेअर स्प्लिट : १:५ या प्रमाणात एप्रिल २०२२ मध्येरिटर्न्स : गेल्या १० वर्षांत ४ पट रिटर्न दिले आहेत.डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.भविष्यात संधी : चांगली राहील. पिझ्झा खाणे सर्वांना आवडते. यामुळे कंपनीच्या व्यवसाय वाढीसाठी ही आवड पूरक ठरेल. जितका उत्तम दर्जा आणि तत्पर सेवा देण्यामध्ये कंपनी उत्कृष्ट कार्य करेल तितकाच व्यवसाय वाढू शकतो. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

टीप : हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.

 

टॅग्स :शेअर बाजार