Join us

रिलायन्सला पहिल्याच आठवड्यात झटका! ३८,४९५ कोटींचे नुकसान, Airtel, SBI'लाही धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 4:50 PM

गेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ०.७७ टक्क्यांनी वर होता. गेल्या आठवड्यात, रिलायन्स इंडस्ट्रीजचा एमकॅप ३८,४९५.७९ कोटी रुपयांच्या तोट्यासह १६,३२,५७७.९९ कोटी रुपये होता.

गेल्या आठवड्यात रिलायन्समध्ये मोठे बदल करत अनेक नव्या घोषणा केल्या. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला, सेन्सेक्समधील टॉप-१० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात एकूण ६२,२७९.७४ कोटी रुपयांनी घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वाधिक नुकसान झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), ICICI बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, ITC, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि भारती एअरटेल यांनी गेल्या आठवड्यात बाजार मूल्यांकनात घसरण झाली. दुसरीकडे, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि बजाज फायनान्सच्या बाजारातील स्थिती वाढली.

एका दिवसात अचानकच 9330% वधारला हा शेअर, आता 99%नी घसरला, आला ₹1 वर; नेमकं काय घडलं? 

गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ३८,४९५.७९ कोटी रुपयांच्या तोट्यावरून १६,३२,५७७.९९ कोटी रुपयांवर घसरले. हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य १४,६४९.७ कोटी रुपयांनी घसरून ५,८८,५७२.६१ कोटी रुपये आणि भारती एअरटेलचे बाजारमूल्य ४,१९४.४९ कोटी रुपयांनी घसरून ४,८४,२६७.४२ कोटी रुपयांवर आले.

ITC चे मार्केट कॅप ३,०३७.८३ कोटी रुपयांनी घसरून ५,५०,२१४.०७ कोटी रुपये आणि ICICI बँकेचे मार्केट कॅप ८९८.८ कोटी रुपयांनी घसरून ६,७८,३६८.३७ कोटी रुपयांवर आले. TCS चे बाजारमूल्य ५१२.२७ कोटी रुपयांनी घसरून १२,३६,४६६.६४ कोटी रुपयांवर आले. SBI चे बाजार भांडवल ४९०.८६ कोटी रुपयांनी घसरून ५,०८,४३५.१४ कोटी रुपये झाले.

याच्या उलट HDFC बँकेचे बाजार भांडवल १०,९१७.११ कोटी रुपयांनी वाढून ११,९२,७५२.१९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. इन्फोसिसचे मूल्यांकन ९,३३८.३१ कोटी रुपयांनी वाढून ५,९८,९१७.३९ कोटी रुपयांवर पोहोचले. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल ६,५६२.१ कोटी रुपयांनी वाढून ४,४३,३५०.९६ कोटी रुपये झाले.

गेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ५००.६५ अंकांनी किंवा ०.७७ टक्क्यांनी वाढला. टॉप-१० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, एसबीआय, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :शेअर बाजाररिलायन्सएसबीआय