गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे 82,082.91 कोटी रुपयांनी घसरलं. रिलायन्स इंडस्ट्रीजला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात टॉप-10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या बाजारमूल्यात घट झाली.
दरम्यान, टॉप-10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजनं पहिलं स्थान कायम राखलं आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, एसबीआय, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक येतो.
तीन कंपन्यांचं मार्केट कॅप वाढलं
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली. या सात कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे 67,814.1 कोटी रुपयांनी वाढले आहे.
किती घसरलं मार्केट कॅप
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 58,690.9 कोटी रुपयांनी घसरून 16,71,073.78 कोटी रुपयांवर आलं. एचडीएफसी बँकेचं मार्केट कॅप 20,893.12 कोटी रुपयांनी घसरून 11,81,835.08 कोटी रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं मार्केट कॅप 2,498.89 कोटी रुपयांनी घसरून 5,08,926 कोटी रुपये झालं.
दुसरीकडे, बजाज फायनान्सचं मार्केट कॅप 21,025.39 कोटी रुपयांनी वाढून 4,36,788.86 कोटी रुपये झालं. आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 13,716.34 कोटी रुपयांनी वाढून 6,79,267.17 कोटी रुपये आणि इन्फोसिसचे बाजारमूल्य 13,199.82 कोटी रुपयांनी वाढून 5,89,579.08 कोटी रुपयांवर गेलं.
एअरटेलचं बाजारमूल्यही वाढलं
भारती एअरटेलचे मार्केट कॅप 9,731.21 कोटी रुपयांनी वाढून 4,88,461.91 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. टीसीएसचं बाजारमूल्य 4,738.47 कोटी रुपयांनी वाढून 12,36,978.91 कोटी रुपये आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 2,972.23 कोटी रुपयांनी वाढून 6,03,222.31 कोटी रुपये झाले. आयटीसीचं मार्केट कॅप 2,430.64 कोटी रुपयांनी वाढून 5,53,251.90 कोटी रुपये झालं.