Join us  

किरकोळ घसरणीसह बाजार बंद, तरी गुंतवणूकदारांनी कमावले ₹५६००० कोटी; रियल्टी, मेटल शेअर्स चमकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 4:32 PM

गुरुवारी शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक किरकोळ घसरणीसह बंद झाले.

गुरुवारी शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक किरकोळ घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स मात्र तेजीत राहिले. यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात सुमारे 56,000 कोटी रुपयांचा नफा झाला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.15 टक्के आणि 0.44 टक्क्यांनी वाढून बंद झाले. तर क्षेत्रीय निर्देशांकात रियल्टी, ऑईल अँड गॅस, एनर्जी आणि मेटल शेअर्समध्ये मजबूत वाढ दिसून आली. दुसरीकडे, फार्मा आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कामकाजाच्या अखेरिस, बीएसई सेन्सेक्स 5.43 अंक किंवा 0.0082 टक्क्यांनी घसरला आणि 66,017.81 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 1.50 अंक किंवा 0.0076 टक्क्यांनी घसरला आणि 19,810.35 च्या पातळीवर बंद झाला.गुंतवणूकदारांनी कमावले 56000 कोटीबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 328.45 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवारी 327.89 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 56,000 कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 56,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.हे शेअर्स वधारलेआज सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.16 टक्के वाढ झाली आहे. तर जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि विप्रोचे शेअर्स जवळपास 0.49 टक्के ते 1.05 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.यामध्ये घसरणसेन्सेक्सचे उर्वरित 15 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सर्वाधिक 1.75 टक्क्यांवरून घसरून बंद झाले. लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिसचे शेअर्स जवळपास 0.55 टक्के ते 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार