ग्राहकांच्या संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म असलेल्या Zerodha चे संस्थापक नितीन कामत (Nithin Kamath) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगप्रसिद्ध गुंतवणूकदार मॉर्गन होशल यांचे एक कोट शेअर केले आहे. तुमच्याकडे किती माहिती किंवा संदर्भ आहे हे महत्त्वाचे नाही. जर तुम्हाला काही हवेच असेल तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही तयारी केली आहे किंवा नाही अथवा तुमच्याकडे पुरेशी माहिती आहे की नाही हे आवश्यक नाही, असा कोट कामत यांनी शेअर केला आहे.
"लोकांना अर्धी जोखीम पत्करून शेअर बाजारातून दुप्पट परतावा मिळवायचा आहे, ते शक्य नाही,” असे नितीन कामत म्हणाले. जर तुम्हाला शेअर बाजारातून चांगला नफा कमवायचा असेल, तर तुम्ही मोठी जोखीम पत्करायला तयार राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
झिरोदाच्या नितीन कामत यांनी आपल्या पोस्टसोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अशी कोणतीही पद्धत नाही, की तुम्ही 50 अब्ज डॉलर्सची एक पोंजी स्कीम चालवाल आणि त्याबाबत लोकांना काही माहिती मिळणार नाही, असे नितीन कामत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. खरं तर, सीरिजच्या ट्रेलरमध्ये, मल्टी-लेव्हल मार्केटिंगद्वारे फसवणूकीच्या बाबतीत हा संदेश देण्यात आला आहे. झिरोदाच्या नितीन कामत यांनी नेटफ्लिक्सवर येणाऱ्या मॅडऑफ: द मॉन्स्टर ऑफ वॉल स्ट्रीट चा व्हिडीओ ट्रेलर शेअर केला आहे. अमेरिकन शेअर बाजारातील फसवणुकीबाबत तयार करण्यात आलेली ही सीरिज आहे.