Lokmat Money >शेअर बाजार > मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये विक्रीमुळे शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये विक्रीमुळे शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market Updates: आजच्या व्यवहारात, गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये सर्वाधिक विक्री केली. ज्यामध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:19 PM2024-10-21T16:19:29+5:302024-10-21T16:19:29+5:30

Stock Market Updates: आजच्या व्यवहारात, गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये सर्वाधिक विक्री केली. ज्यामध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली होती.

mayhem in midcap smallcap stocks due to big selling in indian stock market | मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये विक्रीमुळे शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये विक्रीमुळे शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market Updates : मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजार आज पुन्हा कोसळला. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक दिवसाच्या उच्चांकावरून १३५० अंकांनी घसरला, तर निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक ४१५ अंकांनी घसरला. बाजार बंद होताना मिडकॅप निर्देशांक १००० अंकांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक ३०० अंकांनी घसरला. मात्र, सेन्सेक्स-निफ्टीतील घसरण फार मोठी नव्हती. सेन्सेक्स ७३ अंकांनी घसरून ८१,१५१ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७३ अंकांनी घसरून २४,७८१ अंकांवर बंद झाला.

HDFC बँकेत प्रचंड वाढ
एचडीएफसी बँक आठवड्याच्या शेवटी चांगल्या निकालांमुळे ३-४ टक्क्यांनी वर आहे. टेक महिंद्रामध्येही जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे. सध्या टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, एसबीआय लाइफ, ॲक्सिस बँक आणि विप्रो हे निफ्टीचे सर्वाधिक लाभधारक आहेत. दुसरीकडे टाटा कंझ्युमर कमकुवत निकालानंतर सुमारे ७ टक्क्यांनी घसरला असून तो टॉप लूझर आहे. याशिवाय कोटक महिंद्रा बँकेत ३% आणि भारती एअरटेलमध्ये दीड टक्क्यांची घसरण आहे. हे निफ्टीचे टॉप लूजर्स आहेत.

गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटींचे नुकसान
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. BSE वर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४५३.२७ लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात४५८.२१ लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेक्टरोल अपडेट
आजच्या व्यवहारात ऑटो सेक्टरमध्ये चांगली वाढ झाली. निफ्टीचा ऑटो निर्देशांक १०५ अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर आयटी, एफएमसीजी, बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस समभाग घसरणीसह बंद झाले.
 

Web Title: mayhem in midcap smallcap stocks due to big selling in indian stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.