Join us  

₹१४५ वरून ₹५००० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर; १००००० कोटींपार गेलं मार्केट कॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:52 PM

कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. जहाज बांधणी कंपनीचं मार्केट कॅपही गुरुवारी १,००,००० कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे.

Mazagon Dock Share Price: माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. माझगाव डॉकचा शेअर गुरुवारी ६ टक्क्यांहून अधिक वाढून ४९८९ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. जहाज बांधणी कंपनीचं मार्केट कॅपही गुरुवारी १,००,००० कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे. गेल्या महिनाभरात माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर दोन दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १४५ रुपये होती. माझगाव डॉकचा आयपीओ २९ सप्टेंबर २०२० रोजी खुला झाला होता.

१,००,००० कोटींच्या पुढे मार्केट कॅप

माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानं कंपनीचं मार्केट कॅपही १,००,००० कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स १ लाख कोटी रुपयांचं मार्केट कॅप गाठणारी पहिली जहाज बांधणी कंपनी ठरली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सला २६ जून रोजी नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

४ वर्षांत २८०० टक्क्यांची वाढ

नवरत्न कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स ४ वर्षांत २८०० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. १६ ऑक्टोबर २०२० रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर १६८.०५ रुपयांवर होता. कंपनीचा शेअर ४ जुलै २०२४ रोजी ४९८९ रुपयांवर पोहोचला. तर गेल्या २ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १९०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १ जुलै २०२२ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर २४६.८० रुपयांवर होता. कंपनीचे शेअर्स आता ५००० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत.

शेअर वर्षभरात २९० टक्क्यांनी वधारला

गेल्या वर्षभरात माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये २९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ४ जुलै २०२३ रोजी जहाज बांधणी कंपनीचा शेअर १२८२.४० रुपयांवर होता. कंपनीचा शेअर ४ जुलै २०२४ रोजी ४९८९ रुपयांवर पोहोचला. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये १२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक