Join us

'या' दिग्गज डिफेन्स शेअरनं केला डबल धमाका; स्टॉक स्प्लिट होणार, डिविडेंडही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:16 AM

Mazagon Dock Shipbuilders Ltd Share : यापूर्वी संचालक मंडळानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १० रुपयांच्या इक्विटी शेअर्सवर २३.१९ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली होती. लाभांशाबरोबरच शेअर स्प्लिटची घोषणा केली आहे.

Mazagon Dock Shipbuilders Ltd Share : माझगांव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये या आठवड्यात अंतरिम लाभांशासाठी एक्स-डेट ट्रेडिंग होणार आहे. यापूर्वी संचालक मंडळानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १० रुपयांच्या इक्विटी शेअर्सवर २३.१९ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली होती. लाभांशाबरोबरच माझगांव डॉक शिपबिल्डर्सनं शेअर स्प्लिटची घोषणा केली आहे. आज आपण या पीएसयू स्टॉक स्टॉकची कामगिरी आणि लाभांशाचा इतिहास पाहूया.

किती आहे शेअरची किंमत?

माझगांव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर २८ ऑक्टोबर रोजी १.१७ टक्क्यांनी घसरून ४,०१२.४५ रुपयांवर बंद झाला. या दिवशी हा डिफेन्स पीएसयू शेअर ४,१५३.८५ रुपये ते ३,९९४ रुपये प्रति शेअरच्या रेंजमध्ये व्यवहार करत होता. तसंच एकूण ०.७३ लाख शेअर्सचे व्यवहार झाले, तर दोन आठवड्यांची सरासरी क्वांटिटी २.५० लाख शेअर्सची होती.

लाभांशाचा इतिहास

आपल्या भागधारकांना लाभांश देण्याचा कंपनीचा समृद्ध इतिहास आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सनं २०२४ मध्ये प्रति शेअर १२.११ रुपये लाभांश दिला. पीएसयू कंपनीनं २०२३ मध्ये १५.३४ रुपये आणि ६.८६ रुपये प्रति शेअर दरान लाभांश दिला होता. त्याचप्रमाणे कंपनीन २०२२ मध्ये प्रति शेअर ९.१० रुपये लाभांश दिला होता.

शेअरची किंमत

बीएसई अॅनालिटिक्सनुसार, या पीएसयू शेअरमध्ये गेल्या आठवड्याभरात १४% करेक्शन दिसून आलं आहे, तर गेल्या ३ महिन्यांत त्यात १७.४०% घसरण झाली आहे. गेल्या दोन आणि तीन वर्षांत कंपनीनं अनुक्रमे ५२६.३१% आणि १४६२.४८% उत्कृष्ट परतावा दिलाय.

लाभांशाची रेकॉर्ड डेट

या लाभांशासाठी कंपनीनं ३० ऑक्टोबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. या लाभांशाव्यतिरिक्त माझगाव शिपबिल्डर्सनं स्टॉक स्प्लिटलाही मंजुरी दिली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सनं १:२ गुणोत्तरात स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की प्रत्येकी १० रुपये फेस व्हॅल्यूच्या विद्यमान इक्विटी शेअर्स भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून प्रत्येकी ५ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या दोन इक्विटी शेअर्समध्ये विभागले जातील. कंपनीनं अद्याप स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक