Join us  

याला म्हणतात बम्पर परतावा! ₹1000 हून ₹4200 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 11:27 PM

हा स्टॉक 6 नोव्हेंबर, 2020 रोजी जवळपास ₹1,029 वर होता. यानंतर हा स्टॉक 297.15% च्या मोठ्या उसळीसह मल्टीबॅगर बनला आहे.

गेल्या दोन वर्षांत मिडकॅप कंपनी सोलर इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या काळात, सोलर इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ₹1000 वरून ₹4200 वर पोहोचली आहे. या बम्पर परताव्याचा फायदाही गुंतवणूकदारांनाही झाला आहे. या शेअरमध्ये दोन वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी ₹1 लाखाची गुंतवणूक केली होती, आज त्यांचे ₹4 लाखांहून अधिक झाले असतील.

52 वीठवड्यांतील हाय -  गेल्या सोमवारी, सोलर इंडस्ट्रीजचा स्टॉक ₹4200.15 या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, ट्रेडिंगच्या शेवटी, या शेअरची किंमत ₹ 80.80 अथवा 2.02% ने वाढून ₹ 4087 वर पोहोचली होती. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप 36,990 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. 

महत्वाचे म्हणजे, 25 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरदरम्यान कंपनीचा शेअर 5% नी वधारला आहे. 15 फेब्रुवारी, 2022 रोजी सोलर इंडस्ट्रीजचा शेअर 52-आठवड्यांतील सर्वात खालची पातळी 2160 रुपयांवर गेला होता. अशा प्रकारे या स्टॉकने 89% पेक्षाही अधिकची उसळी घेतली आहे.

हा स्टॉक 6 नोव्हेंबर, 2020 रोजी जवळपास ₹1,029 वर होता. यानंतर हा स्टॉक 297.15% च्या मोठ्या उसळीसह मल्टीबॅगर बनला आहे. 52 आठवड्यांतील नवा उच्चांक पाहता, या स्टॉकमध्ये  308% ची मोठी वृद्धी दिसून आली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टकमध्ये ₹1 लाखची गुंतवणूक केली होती, त्यांच्याकडे आता ₹3.97 लाख ते ₹4.08 लाख रुपयांचा फंड जमा झाला असेल.

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार