Lokmat Money >शेअर बाजार > या कंपनीनं Aditya L1 साठी केला मेटलचा पुरवठा, आता शेअरनं रॉकेट स्पीड घेतला; देतोय बम्पर परतावा! 

या कंपनीनं Aditya L1 साठी केला मेटलचा पुरवठा, आता शेअरनं रॉकेट स्पीड घेतला; देतोय बम्पर परतावा! 

ही बातमी समोर आल्यानंतर, मिश्र धातू निगम लिमिटेडचा शेअर सोमवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या तेजीसह 435.30 रुपयांवर पोहोचला आहे, हा कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील नवा उच्चांक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 05:32 PM2023-09-04T17:32:30+5:302023-09-04T17:33:06+5:30

ही बातमी समोर आल्यानंतर, मिश्र धातू निगम लिमिटेडचा शेअर सोमवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या तेजीसह 435.30 रुपयांवर पोहोचला आहे, हा कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील नवा उच्चांक आहे.

midhani supplied metal for Aditya L1, now the share has taken rocket speed; Giving a bumper return | या कंपनीनं Aditya L1 साठी केला मेटलचा पुरवठा, आता शेअरनं रॉकेट स्पीड घेतला; देतोय बम्पर परतावा! 

या कंपनीनं Aditya L1 साठी केला मेटलचा पुरवठा, आता शेअरनं रॉकेट स्पीड घेतला; देतोय बम्पर परतावा! 

भारताने आपले पहिले सौर मिशन आदित्य-L1 यशस्वीपणे लॉन्च केले. या प्रोजेक्टसाठी मिश्रा धातू निगम लिमिटेड (MIDHANI) या सरकारी कंपनीने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. या कंपनीने आदित्य-एल1 प्रोजेक्टसाठी मेटल आणि अॅलॉयचा पुरवठा केला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर, मिश्र धातू निगम लिमिटेडचा शेअर सोमवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या तेजीसह 435.30 रुपयांवर पोहोचला आहे, हा कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील नवा उच्चांक आहे.

चंद्रयान-3 मिशन साठीही केला होता मेटलचा पुरवठा - 
मिश्र धातू निगम लिमिटेडने (MIDHANI) दिलेल्या माहितीनुसार, 'मिधानिने पुरवलेल्या सामग्रीचा वापर सौर मिशन आदित्य एल-1चे लॉन्चर व्हेइकल PSLV-C57 मध्ये करण्यात आला आहे. याशिवाय, कंपनीने इतरही अनेक कंपोनंन्टचा पुरवठा केला आहे. यापूर्वी, सरकारी कंपनी असलेल्या मिश्र धातू निगम लिमिटेडने चंद्रयान-3 मिशनसाठीही विशेष मेटल आणि अॅलॉयचा पुरवठा केला होता.' 

6 महिन्यांत 109 टक्क्यांचा परतावा - 
मिश्र धातू निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या 6 महिन्यांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 6 मार्च 2023 रोजी बीएसईवर 204.65 रुपयांवर होता. तो 4 सप्टेंबर 2023 रोजी बीएसईवर 435.85 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरने 109 टक्क्यांची उसळी घेतली आहे. तसेच, या वर्षात आतापर्यंत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 90 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 8000 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

 

Web Title: midhani supplied metal for Aditya L1, now the share has taken rocket speed; Giving a bumper return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.