EPFO : भविष्य निर्वाह निधी योजनेद्वारे पगारदार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती निधी उभारण्याची आणि नियमित गुंतवणूक करण्याची संधी मिळते. कर्मचारी निवृत्तीनंतर या योजनेतील संपूर्ण किंवा हवीतेवढी रक्कम काढू शकतात. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करणे हा त्याचा उद्देश आहे. पीएफ योजनांतर्गत कर्मचारी दर महिन्याला त्यांच्या उत्पन्नातील काही प्रमाणात योगदान देतात आणि निवृत्तीनंतर एकूण रक्कम मिळवतात. विशेष म्हणजे, ही रक्कम पेन्शन म्हणूनदेखील घेता येऊ शकते.
30 वर्षात करोडपतीजर तुम्ही 30 वर्षांपासून सतत काम करत असाल, तर तुम्हाला निवृत्तीपर्यंत कोट्यवधी रुपये मिळू शकतात. तुम्ही 30 वर्षांपासून सतत काम करत असाल आणि दर महिन्याला तुमच्या पीएफमध्ये किमान 7200 रुपये जात असतील, तर तुम्ही 30 वर्षांत करोडपती होऊ शकता.
तुम्ही पीएफमध्ये दर महिन्याला 7200 रुपये गुंतवले आणि त्यावर 8.25 टक्के व्याज मिळाले, तर 30 वर्षांत तुम्हाला 1,10,93,466 रुपये मिळतील. एवढेच नाही तर पीएफ जमा करण्यासोबतच तुम्हाला अनेक सेवाही मिळतात.
पेन्शनचा लाभपीएफचे पैसे दोन भागांमध्ये जमा केले जातात. EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि EPS म्हणजे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना. तुमच्या पगारातून 12 टक्के रक्कम कंपनी देते. पेन्शन कॉर्पस कंपनीच्या योगदानातून तयार केला जातो. पेन्शनची पात्रता वयाच्या 58 नंतरच मिळते आणि त्यासाठी तुम्ही किमान 10 वर्षे नोकरी केलेली असावी. पेन्शनची किमान रक्कम रु. 1,000 आहे.
ईपीएफ व्यतिरिक्त कर्मचारी व्हीपीएफ म्हणजेच स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधीमध्येदेखील गुंतवणूक करू शकतात. तुम्ही VPF मध्ये तुमच्या मूळ पगारावर अतिरिक्त योगदान देखील देऊ शकता.