Mobikwik IPO Allotment Status : मोबिक्विकच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप करण्यात आलंय. जर तुम्हीही मोबिक्विकच्या आयपीओसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचं अलॉटमेंट स्टेटस तपासू शकता. ग्रे मार्केटमध्ये कंपनी चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे लिस्टिंग जबरदस्त होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जीएमपी १६५ रुपयांवर
ग्रे मार्केटमध्ये कंपनीचं स्थान बऱ्यापैकी मजबूत आहे. इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, मोबिक्विकचा आयपीओ आज १६५ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. ज्यामुळे उत्तम लिस्टिंग अपेक्षित आहे. गेल्या ४ दिवसांपासून जीएमपीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
मोबिक्विकच्या आयपीओसाठी प्राइस बँड २६५ ते २७९ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं एकूण ५३ शेअर्सचा एक लॉट तयार केलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना १४ हजार ७८७ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ३ दिवसांदरम्यान कंपनीचा आयपीओ १०० पेक्षा जास्त पट सब्सक्राइब झाला. हा आयपीओ ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत सब्सक्रिप्शनसाठी खुला होता. अँकर गुंतवणूकदारांकडून २५७.४० रुपये गोळा करण्यात कंपनीला यश आले होते. मोबिक्विकचा आयपीओ १० डिसेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला.
अलॉटमेंट स्टेटस कसं पाहाल?
- सर्वप्रथम अधिकृत रजिस्ट्रारच्या साइटवर जा किंवा थेट https://linkintime.co.in/initial_offer/ यूआरएल उघडा.
- कंपनीचं नाव लिहा.
- तुमचा पॅन, अॅप्लिकेशन नंबर किंवा डीपी क्लायंट आयडी टाका.
- सबमिट बटण दाबा.
- तुम्हाला शेअर्स अलॉट झाले आहेत का नाही हे त्यानंतर दिसेल.
NSE च्या वेबसाईटवर कसं पाहाल
- एनएसईच्या वेबसाइटवर जा किंवा https://www.nseindia.com/products/dynaContent/equities/ipos/ipo_login.jsp डायरेक्ट लिंक ओपन करा.
- तुमची माहिती एन्टर करा.
- मोबिक्विक सिस्टम्स लिमिटेड हा पर्याय निवडा.
- आयपीओचा अर्ज क्रमांक लिहा.
- सबमिट करताच तुमचं अलॉटमेंट डिटेल दिसेल.
(टीप - यामध्ये आयपीओ विषयी सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)