Join us  

मोदी सरकार घेऊन येतेय 'या' कंपनीचा IPO, २६.८८ कोटी शेअर्सची होणार विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 3:47 PM

केंद्राच्या मालकीच्या कंपनीचा आयपीओ २१ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.

केंद्राच्या मालकीच्या इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा (IREDA) आयपीओ (IPO) 21 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुंतवणूकदार 23 नोव्हेंबरपर्यंत इश्यूसाठी अर्ज करू शकतात. गेल्यावर्षी मे महिन्यात लाईफ इन्शुरन्स कॉर्पच्या पब्लिक इश्यूनंतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा हा पहिला आयपीओ असेल.सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या कंपनीच्या आयपीओमध्ये 40.31 कोटी नवे शेअर्स जारी केले जातील. याशिवाय भारत सरकारद्वारे 26.88 कोटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव आहे. इश्यूसाठी लवकरच प्राईज बँडची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 18.75 लाख इक्विटी शेअर्स आरक्षित ठेवले आहेत.

अधिक माहितीइश्यू साईजचा अर्धा भाग इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी आरक्षित आहे आणि १५ टक्के उच्च नेटवर्थ असलेल्या व्यक्तींसाठी आरक्षित आहे. याशिवाय नेट इश्यू साईजच्या ३५ टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित ठेवले आहेत.

टॅग्स :शेअर बाजारसरकार