Join us  

मोदी सरकार 'या' सरकारी कंपनीची 26% हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत! शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 4:14 PM

सरकरचा बीईएमएलमध्ये 54.03 टक्के एवढा वाटा आहे...

संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम असलेल्या BEML च्या धोरणात्मक विक्रीसाठी सरकार लवकरच आर्थिक निविदा मागवू शकते. गेल्या महिन्यातच कंपनीचा नॉन-कोअर उद्योग शेअर बाजारात सुचीबद्ध झाल्यानंतर, सरकार हे पाऊल उचलत आहे. सरकारने जानेवारी 2021 मध्ये व्यवस्थापन नियंत्रणासह BEML मधील 26 टक्के हिस्सेदारी विकण्यासाठी प्रारंभिक निविदा मागविल्या होत्या.  या विक्रीसाठी बरेच एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) आले होते.

यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बीईएमएलने आपला नॉन-कोअर व्यवसाय बीईएमएल लँड अॅसेट्समधून वेगळा केला होता. नव्या कंपनीला 19 एप्रिल, 2023 रोजी एक्सचेंजेसवर सूचीबद्ध केले होते. एका अधिकाऱ्याने पीटीआय-भाषासोबद बोलताना म्हटले आहे की, ''जमीन आणि इतर नॉन-कोअर व्यवसायांची सूचीबद्धता पूर्ण झाली आहे. आता आम्ही लवकरच मुख्य संपत्तीसाठी आर्थिक बोल्या आमंत्रित करत आहोत. ज्या निर्माण आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित असतील.''

शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड -कंपनीचा शेअर शुक्रवारी 0.59 टक्क्यांच्या घसरणीसह 1381.15 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या 5 दिवसांसंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 15 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. तसेच, या शेअरमध्ये 1 महिन्यापूर्वी गुंतवणूक करणाऱ्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला आहे.

बीईएमएलही विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी कंपनी आहे. ही कंपनी देश आणि परदेशातही संरक्षण, विमान, खाणकाम तथा निर्माण, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातील ग्राहकांना उत्पादने आणि सेवा पुरवते. सरकरचा बीईएमएलमध्ये 54.03 टक्के एवढा वाटा आहे. हा संरक्षण मंत्रालयांतर्गत येणारा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. सध्याच्या बाजार भावानुसार, बीईएमएलमधील सरकारच्या 26 टक्के हिस्सेदारीच्या विक्रीतून जवळपास 1,500 कोटी रुपये मिळतील.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजारपैसा