Join us  

एका झटक्यात तिपटीपेक्षा अधिक वाढला पैसा! ३३९% प्रीमिअमसह ₹१४५ वर Maxposure आयपीओ लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:50 PM

गेल्या काही दिवसांमध्ये आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

Maxposure IPO listing: गेल्या काही दिवसांमध्ये आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आज Maxposure चे शेअर्स शेअर बाजारात लिस्ट झाले. 23 जानेवारी रोजी कंपनीचे शेअर्स 339.39 टक्के प्रीमिअमसह 145 रुपयांवर लिस्ट झाले. एसएमई कॅटेगरीमध्ये या शेअरनं अन्य शेअर्सना मागे टाकलं आहे. या शेअरची इश्यू प्राईज 33 रुपये होती.विक्रमी सबस्क्रिप्शनमॅक्सपोजरच्या धमाकेदार एन्ट्रीप्रमाणेच त्याला गुंतवणूकदारांचाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. हा आयपीओ 987.47 पट सबस्क्राईब झाला. त्यानुसार, 2024 मध्ये तो सर्वाधिक सबस्क्राईब झालेला इश्यू बनला. SME कॅटेगरीचा हा IPO 15 जानेवारीला उघडला आणि 17 जानेवारीला बंद झाला. या इश्यूद्वारे 20.26 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना होती. या SME IPO ला 2024 मध्ये सर्वाधिक सबस्क्रिप्शन मिळालं.किती झाला सबस्क्राईब?क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा 162.35 पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा 1947.55 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 1034.23 पट सबस्क्राईब झाला होता. या आयपीओ अंतर्गत 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे 61.40 लाख नवे शेअर्स जारी करण्यात आले.कुठे होणार पैशांचा वापर?या शेअर्सद्वारे उभारलेला निधी युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडून (FAA) कंपनीच्या वायरलेस स्ट्रीमिंग सर्व्हरसाठी आणि पेटंट इनव्हिसिओ ट्रे टेबलसाठी प्रमाणपत्र मिळवण्याशी संबंधित खर्च पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल. याशिवाय खेळत्या भांडवलाची आवश्यकता म्हणून, तसंच कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी याचा वापर करण्यात येणार आहे.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजार