कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग कंपनी केईसी इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये गुरुवारी केईसी इंटरनॅशनलचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून ९५० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं उच्चांकी स्तर गाठला आहे. नवीन ऑर्डर मिळाल्यानं केईसी इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. कंपनीला १०२५ कोटी रुपयांच्या नव्या ऑर्डर मिळाल्या असल्याची माहिती समोर आलीये.
केईसी इंटरनॅशनलला पारेषण आणि वितरण, तसंच केबल व्यवसायात नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डरची किंमत १०२५ कोटी रुपये आहे. पारेषण व वितरण क्षेत्रात कंपनीला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ७६५ केव्हीचा जीआयएस सबस्टेशन प्रकल्प मिळाला आहे. याव्यतिरिक्त, केईसी इंटरनॅशनलला पश्चिम आफ्रिकेत सबस्टेशन, ट्रान्समिशन लाइन आणि भूमिगत केबलिंगच्या कामासह २२५ केव्ही कंपोझिट प्रकल्प मिळाला आहे. केईसी इंटरनॅशनल अमेरिकेला टॉवर्स, हार्डवेअर आणि पोल पुरवणार आहे.
कशी आहे शेअर्सची स्थिती?
गेल्या वर्षभरात केईसी इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. २७ जून २०२३ रोजी कंपनीचा शेअर ५५० रुपयांवर होता. केईसी इंटरनॅशनलचा शेअर २७ जून २०२४ रोजी ९५० रुपयांवर पोहोचला. गेल्या ६ महिन्यांत केईसी इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये ५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर २७ डिसेंबर २०२३ रोजी ५९०.०५ रुपयांवर होता, जो २७ जून २०२४ रोजी ९५० रुपयांवर पोहोचलाय.
महिन्याभरात २० टक्क्यांहून अधिक वाढ
गेल्या महिनाभरात केईसी इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत केईसी इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये २५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २६ जून २०२० रोजी कंपनीचा शेअर २६१.६० रुपयांवर होता. केईसी इंटरनॅशनलचा शेअर २७ जून २०२४ रोजी ९५० रुपयांवर पोहोचलाय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)