Lokmat Money >शेअर बाजार > ७००० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षभरात पैसे झाले तिप्पट

७००० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षभरात पैसे झाले तिप्पट

महाराष्ट्र सरकार आणि बेस्टकडूनही कंपनीला इलेक्ट्रीक बसेसची ऑर्डर देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 02:28 PM2024-02-09T14:28:02+5:302024-02-09T14:29:38+5:30

महाराष्ट्र सरकार आणि बेस्टकडूनही कंपनीला इलेक्ट्रीक बसेसची ऑर्डर देण्यात आली आहे.

More than 7000 orders of electric buses maharashtra best olectra greentech ltd investors jump on shares money tripled in a year | ७००० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षभरात पैसे झाले तिप्पट

७००० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षभरात पैसे झाले तिप्पट

EV Stocks 2024: इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडच्या (Olectra Greentech Ltd) शेअर्समध्ये आज 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सने एनएसईवर 2048 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या 3 महिन्यांत या ईव्ही कंपनीच्या शेअर्समध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, ओलेक्ट्रा ग्रीनटेककडे 7000 हून अधिक बसेसची ऑर्डर आहे. 
 

7000 पेक्षा अधिक बसेसची आहे ऑर्डर
 

अलीकडे कंपनीला अनेक मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. कंपनीला बेस्ट, टीएसआरटीसी आणि एमएसआरटीसीकडून ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. TSRTC नं ओलेक्ट्रा ग्रीनटेकला 550, बेस्टनं 2100 बसेस आणि एमएसआरटीसीनं 5150 बसेसची ऑर्डर दिली आहे. म्हणजे सध्या कंपनीला 7000 हून अधिक बसेस पुरवण्याचं कंत्राट दिलं आहे.
 

या सेगमेंटवर फोकस
 

इलेक्ट्रिक बस सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर कंपनी आता 3 चाकी वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी ऑटो आणि इलेक्ट्रिक ट्रक सेगमेंटवरही लक्ष केंद्रित करत आहे. याच महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनने रिलायन्सच्या मदतीनं हायड्रोजन बस सादर केली आहे.
 

वर्षभरात पैसे तिप्पट
 

कंपनीच्या शेअर्समध्ये 6 महिन्यांमध्ये 80 टक्क्यांची तेजी आली आहे. तर एका वर्षाच्या आत पोझिशनल गुंतवणूकदारांना 320 टक्क्यांचा फायदा झालाय. कंपनीचं मार्केट कॅप 16000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
 

(टीप - यामध्ये शेअरच्य कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: More than 7000 orders of electric buses maharashtra best olectra greentech ltd investors jump on shares money tripled in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.