Lokmat Money >शेअर बाजार > Motisons Jewellers IPO लिस्ट होताच गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट, शेअर ९८% प्रीमिअमवर लिस्ट

Motisons Jewellers IPO लिस्ट होताच गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट, शेअर ९८% प्रीमिअमवर लिस्ट

मोतीसन्स ज्वेलर्सचा स्टॉक आज शेअर बाजारात लिस्ट झाला. शेअर लिस्ट होताच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 01:27 PM2023-12-26T13:27:54+5:302023-12-26T13:28:22+5:30

मोतीसन्स ज्वेलर्सचा स्टॉक आज शेअर बाजारात लिस्ट झाला. शेअर लिस्ट होताच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

Motisons Jewelers doubles investors money as soon as IPO listing shares listed at 98 percent premium bse nse listing | Motisons Jewellers IPO लिस्ट होताच गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट, शेअर ९८% प्रीमिअमवर लिस्ट

Motisons Jewellers IPO लिस्ट होताच गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट, शेअर ९८% प्रीमिअमवर लिस्ट

Motisons Jewellers IPO Listing: मोतीसन्स ज्वेलर्सचा स्टॉक आज शेअर बाजारात लिस्ट झाला. शेअर लिस्ट होताच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. हा शेअर एनएसईवर 98.18 टक्के प्रीमियमवर 109 रुपयांवर लिस्ट झाला. तर बीएसईवर हा शेअर 88.91 टक्के प्रीमियमवर 103.90 रुपयांवर लिस्ट झाला. या इश्यूची किंमत 55 रुपये होती. यापूर्वी, पब्लिक इश्यूलादेखील प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अखेरच्या दिवशी या इश्यूला 173 पटींपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला होता. या आयपीओद्वारे कंपनीला 151 कोटी रुपये उभारायचे होते.

मोतीसन्स ज्वेलर्सच्या 151 कोटी आयपीओसाठी 47.44 लाख अर्ज मिळाले होते. ज्यामुळे आयपीओमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार टाटा टेक आणि एलआयसीनंतरचा हा तिसरा सर्वात मोठा आयपीओ बनला. टाटा टेकच्या आयपीओसाठी 75 लाख आणि एलआयसीच्या आयपीओसाठी 50 लाख अर्ज मिळाले होते.

संस्थात्मक गुंतवणुकदारांचा हिस्सा आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा अनुक्रमे 157.40 पट आणि 233.91 पट सबस्क्राईब झाला होता. तर दुसरीकडे किरकोळ गुंतवणुकदारांचा हिस्सा 122.28 पट सबस्क्राईब झाला होता. मोतीसन्स ज्वेलर्सचा हा आयपीओ 18 ते 20 डिसेंबरदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. याची इश्यू प्राईज 55 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर लॉट साईज 250 शेअर्सची होती. 

कंपनीबद्दल माहिती
कंपनीची सुरुवात ऑक्टोबर 1997 मध्ये करण्यात आली. कंपनी गोल्ड, सिल्व्हर, डायमंड आणि अन्य मेटल्सच्या व्यवसायात कार्यरत आहे. ज्वेलरी प्रोडक्ट रेंजमध्ये सोने, हिरे आणि अन्य मिळून 3 लाखांपेक्षा अधिक डिझाईन्सचा समावेश आहे. मोतीसन्स ज्वेलर्सचं फ्लॅगशिप स्टोअर राजस्थानमधील जयपूर येथे आहे. या इश्यूनंतर प्रमोटर्सचा हिस्सा कमी होऊन 66 टक्के होईल.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Motisons Jewelers doubles investors money as soon as IPO listing shares listed at 98 percent premium bse nse listing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.