Join us

MRF Share Price : 'लाख मोलाचा शेअर', १ लाख रुपयांचा टप्पा पार करणारा MRF ठरला पहिला स्टॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:49 AM

टायर तयार करणाऱ्या एमआरएफ (MRF) कंपनीच्या शेअरनं मंगळवारी बाजारात इतिहास रचला.

टायर तयार करणाऱ्या एमआरएफ (MRF) कंपनीच्या शेअरनं मंगळवारी बाजारात इतिहास रचला. एमआरएफच्या शेअरनं मंगळवारी कामकाजादरम्यान १ लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. दरम्यान, एक लाख रुपयांचा टप्पा पार करणारा एमआरएफ हा पहिलाच शेअर ठरलाय. मंगळवारी शेअर बाजारात एमआरएफच्या शेअरमध्ये १.३७ टक्क्यांची वाढ होऊन ते १००३०० रुपयांवर पोहोचले होते. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची किमान पातळी ६५,९००.०५ रुपये आहे.

या वर्षी मे महिन्याच्या सुरूवातीला एमआरएफचा शेअर लाख रुपयांच्या जवळ पोहोचला होता. पण त्याला १ लाखाचा टप्पा गाठता आला नाही. फ्युचर मार्केटमध्ये एमआरएफचे शेअर्स ८ मे २०२३ रोजी १ लाख रूपयांपर्यंत पोहोचले होते. एमआरएफचे एकूण ४२,४१,१४३ शेअर्स आहेत. त्यापैकी ३०,६०,३१२ शेअर्स पब्लिक शेअर होल्डर्सकडे आहेत. प्रमोटर्सकडे कंपनीचे ११,८०,८३१ शेअर्स आहेत.

वर्षभरात ४५ टक्क्यांची वाढएमआरएफच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. टायर कंपनीचे शेअर्स १३ जून २०२२ रोजी बीएसईवर ६८,५६१ रुपयांच्या पातळीवर होते. १३ जून रोजी कामकाजादरम्यान हे शेअर्स १००३०० रुपयांच्या पातळीवर पोहोचले. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांची तेजी आली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक