Lokmat Money >शेअर बाजार > अवघ्या 7 दिवसात 80% वाढले MTNL चे शेअर्स; वर्षभरात दिला 287% परतावा...

अवघ्या 7 दिवसात 80% वाढले MTNL चे शेअर्स; वर्षभरात दिला 287% परतावा...

गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:30 PM2024-07-22T17:30:47+5:302024-07-22T17:31:22+5:30

गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

MTNL Share rose 80% in just 7 days; 287% returns in one year... | अवघ्या 7 दिवसात 80% वाढले MTNL चे शेअर्स; वर्षभरात दिला 287% परतावा...

अवघ्या 7 दिवसात 80% वाढले MTNL चे शेअर्स; वर्षभरात दिला 287% परतावा...

MTNL Share : उद्या, म्हणजेच 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तत्पुर्वी, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) च्या शेअर्समध्ये वादळी वाढ झाली आहे. MTNL चा शेअर सोमवारी(दि.22) 10% वाढून 76.25 रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. यापूर्वी, शुक्रवारी हा शेअर 69.32 रुपयांवर बंद झाला होता. 

7 दिवसात शेअर्स 80% पेक्षा जास्त वाढ
विशेष म्हणजे, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) च्या शेअर्समध्ये गेल्या 7 दिवसात 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. MTNL चे शेअर्स 11 जुलै 2024 रोजी 42.30 रुपयांवर होते, जे आज 76.25 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, गेल्या 5 दिवसात हा शेअर 61% ने वाढले आहे. 15 जुलै 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 47.38 रुपयांवर होते, जे आज 76.25 रुपयांवर पोहोचले आहेत. 

1 वर्षात 287% वाढ
मत्वाची गोष्ट म्हणजे, MTNL च्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 287% वाढ झाली आहे. टेलिकॉम कंपनीचे शेअर्स 24 जुलै 2023 रोजी 19.74 रुपयांवर होते, जे 22 जुलै 2024 रोजी 76 रुपयांच्या पुढे गेले आहेत. या वर्षी आतापर्यंत एमटीएनएलचे शेअर्स जवळपास 130% वाढले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी टेलिकॉम कंपनीचे शेअर्स 33.23 रुपयांवर होते. हा कल पाहता येत्या काही दिवसात या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

Web Title: MTNL Share rose 80% in just 7 days; 287% returns in one year...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.