Join us

Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 7:19 PM

Muhurat Trading : शेअर बाजारात आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त एका तासासाठी ट्रेडिंग सुरू होतं. मुहूर्त ट्रेडिंग म्हणून ओळखला जाणारा हा १ तासाचा ट्रेडिंग दरवर्षी दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका विशेष सत्रांतर्गत आयोजित केला जातो.

Muhurat Trading : शेअर बाजारात आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त एका तासासाठी ट्रेडिंग सुरू होतं. मुहूर्त ट्रेडिंग म्हणून ओळखला जाणारा हा १ तासाचा ट्रेडिंग दरवर्षी दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका विशेष सत्रांतर्गत आयोजित केला जातो. गेल्या दिवाळीपासून यंदाच्या दिवाळीपर्यंत बाजारानं गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत यापुढेही चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान, शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. मुहूर्त ट्रेडिंगनंतर शेअर बाजार तेजीसह बंद झाला.

एक तासाच्या मुहूर्त ट्रेडिंगच्या अखेरिस शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३५ अंकांनी वधारून ७९,७२४.१२ वर, तर निफ्टी ५० हा ९४ अंकांनी वधारून २४,२९९.५५ वर बंद झाला. बीएसईच्या टॉप ३० पैकी २६ शेअर्समध्ये तेजी होती. तर ४ शेअर्समध्ये घसरण झाली. शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान बीएसईचं मार्केट कॅप ४४४ लाख कोटी रुपयांवरून ४४८ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांनी सुमारे ४ लाख कोटी रुपयांती कमाई केली.

'या' १० शेअर्समध्ये तेजी

मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी ऑटो सेक्टरच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांनी वाढ होऊन २८१२ रुपयांवर व्यवहार झाला. त्यापाठोपाठ अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, पीएनबी, झोमॅटो, भारत डायनॅमिक, आयआरबी इन्फ्रा आणि पिरामल फार्मा यांचे शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत वधारले.

निफ्टीवर ट्रेडिंग करणाऱ्या १५७ शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं होतं. तर, १६ शेअर्समध्ये लोअर सर्किट लोअर सर्किट लागलं. तर ७० शेअर्सनं ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. तर ८ शेअर्सनं ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक