Lokmat Money >शेअर बाजार > मुकेश अंबानी यांना अमेरिकेतून मिळाली गुड न्यूज; एकाच दिवसात झाला 70 हजार कोटींचा फायदा

मुकेश अंबानी यांना अमेरिकेतून मिळाली गुड न्यूज; एकाच दिवसात झाला 70 हजार कोटींचा फायदा

पुन्हा एकदा कंपनीचे मार्केट कॅप 20 लाख कोटींच्या पुढे गेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:43 PM2024-03-27T21:43:29+5:302024-03-27T21:44:47+5:30

पुन्हा एकदा कंपनीचे मार्केट कॅप 20 लाख कोटींच्या पुढे गेले.

Mukesh Ambani got good news from America; A profit of 70 thousand crores was made in a single day | मुकेश अंबानी यांना अमेरिकेतून मिळाली गुड न्यूज; एकाच दिवसात झाला 70 हजार कोटींचा फायदा

मुकेश अंबानी यांना अमेरिकेतून मिळाली गुड न्यूज; एकाच दिवसात झाला 70 हजार कोटींचा फायदा

Mukesh Ambani Reliance: दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी बुधवारचा दिवस अतिशय चांगला राहिला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त वाढ झाली. या वाढीमुळे RIL च्या मार्केट कॅपमध्ये 70 हजार कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली. ही वाढ अमेरिकन फर्म गोल्डमन सॅक्सच्या एका विधानानंतर झाली, ज्यात त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. अमेरिकन फर्मने कंपनीच्या शेअर्सची टार्गेट किंमतही 4,495 रुपये केली आहे. यामुळेच रिलायन्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे. 

कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांनी वाढ
बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. यामुळे कंपनीचे शेअर्स सुमारे चार टक्क्यांनी वाढले. यासह कंपनीच्या मार्केट कॅपने पुन्हा एकदा 20 लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडली. बीएसईवर कंपनीचा शेअर्स 3.60 टक्क्यांनी वाढून 2,987.85 रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंगदरम्यान हा चार टक्क्यांनी वाढून 2,999.90 रुपये झाला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये हा 3.48 टक्क्यांनी वाढून 2,983.75 रुपये प्रति शेअरवर बंद झाला.

कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीचे मार्केट कॅप 70,039.26 कोटी रुपयांनी वाढून 20,21,486.59 कोटी रुपयांवर पोहोचले. व्हॉल्यूमच्या बाबतीत, कंपनीचे 4.71 लाख शेअर्स BSE वर आणि सुमारे 81.63 लाख शेअर्सचे NSE वर व्यवहार झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ही या वर्षी 13 फेब्रुवारी रोजी 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल साध्य करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.

(टीप-हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Mukesh Ambani got good news from America; A profit of 70 thousand crores was made in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.