Mukesh Ambani : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सर्वच ओळखतात. संपत्तीची विभागणी झाल्यानंतर मुकेश अंबानी यांनी केलेली प्रगती अफाट आहे. त्यांनी ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आज तिथं त्यांच्या कंपनीचा दबदबा निर्माण झाला आहे. गेल्या शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी त्यांनी त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा केला. १९ एप्रिलपर्यंतच्या फोर्ब्सच्या रिअल-टाइम डेटानुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९६.७ अब्ज डॉलर्स आहे. पण, मुकेश अंबानी दररोज किती पैसे कमावत असतील असं तुम्हाला वाटतं?
अंबानी.. आशियातील पहिले तर जगातील १८ व्या क्रमांकाचे श्रीमंतफोर्ब्सच्या यादीनुसार, २०२५ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी १८ व्या क्रमांकावर आहेत. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या डिजिटल सेवा व्यवसाय जिओसाठी कमी वेळात सर्वाधिक ग्राहकांना जोडण्याचा विश्वविक्रम रचला आहे. याशिवाय, जगातील सर्वात मोठ्या 4G ब्रॉडबँड वायरलेस नेटवर्कपैकी एक तयार करण्याचे श्रेय देखील त्यांना जाते. याद्वारे, डिजिटल सेवांनी शिक्षणापासून आरोग्यसेवा, आर्थिक सेवा, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली.
२०२४ मध्ये मालमत्तेत झाली होती घटगेल्या दशकात मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२० मध्ये ते ३६ अब्ज डॉलरपासून सुरू होऊन २०२४ पर्यंत ते ११४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती त्यांनी कमावली होती. रिलायन्सजिओ आणि रिलायन्स रिटेलच्या जलद विस्तारामुळे ही वाढ झाली आहे. आज, जिओचे देशभरात ४५ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. रिलायन्स रिटेलने जगातील सर्वात मोठ्या रिटेल कंपन्यांमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये रिलायन्सच्या शेअर मूल्यात घसरण झाल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत सुमारे ९६.७ अब्ज डॉलर्सपर्यंत घट झाली आहे.
वाचा - ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
मुकेश अंबानी दररोज किती कमावतात?मुकेश अंबानी दररोज अंदाजे १६३ कोटी रुपये कमवतात. ते हे उत्पन्न रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कंपन्यांमधून मिळवतात, जे टेलिकॉम, पेट्रोकेमिकल, तेल, रिटेल अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पसरलेले आहे. २०२० पर्यंत ते दर तासाला ९० कोटी रुपये कमवत होते. त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की एखाद्या भारतीयाने दरवर्षी ४ लाख रुपये कमवले तरी त्याला अंबानीइतकी संपत्ती कमावण्यासाठी १.७४ कोटी वर्षे लागतील, जे अशक्य आहे.