Join us  

5 दिवसात 26000 कोटींची कमाई...मुकेश अंबानींच्या Reliance ने गुंतवणूकदारांना केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 1:45 PM

देशतील टॉप 10 पैकी 4 कंपन्यांचे मार्केटकॅपमध्ये कमालीची वाढ झाली.

Mukesh Ambani Reliance: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukehsh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance) आपल्या शेअर होल्डर्सना मोठी कमाई करुन दिली आहे. गेल्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार, या शेअर बाजारातील 5 दिवसांत रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना 26,000 कोटी रुपयांहून अधिकचा नफा झाला.

टॉप 10 पैकी 4 कंपन्यांचे मार्केटकॅप वाढलेदेशातील टॉप-10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या मार्केटकॅपमध्ये घसरण झाली, तर चार कंपन्यांनी त्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी उडी घेतली. या बाबतीत मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आघाडीवर होती. रिलायन्सनंतर कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केटकॅप 16,19,907.39 कोटी रुपयांपर्यंत वाढले. मागील आठवड्याशी तुलना केल्यास 26,014.36 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर, HDFC बँकेचे मार्केट कॅप (HDFC MCap) 20,490.9 कोटी रुपयांनी वाढून 11,62,706.71 कोटी रुपये झाले. भारती एअरटेलच्या गुंतवणूकदारांनी या कालावधीत 14,135.21 कोटी रुपये कमावले आणि कंपनीचे मार्केट कॅप (Bharti Airtel MCap) 5,46,720.84 कोटी रुपये झाले. याशिवाय ICICI बँकेचे मार्केट कॅप 5,030.88 कोटी रुपयांनी वाढून 6,51,285.29 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

टाटा कंपनीचे मोठे नुकसानगेल्या आठवड्यात टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेला मोठा धक्का बसला. कंपनीचे मार्केटकॅफ रु. 16,484.03 कोटींनी घसरून रु. 12,65,153.60 कोटी झाले. बजाज फायनान्सचे मार्केट कॅप 12,202.87 कोटी रुपयांनी घसरून 4,33,966.53 कोटी रुपये झाले, हिंदुस्तान युनिलिव्हरचे मार्केट कॅप 3,406.91 कोटी रुपयांनी घसरून 5,90,910.45 कोटी रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) मार्केट कॅप रु. 2,543.51 कोटींनी घसरले.

(टीप-शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सव्यवसायशेअर बाजारशेअर बाजार