Join us  

मुकेश अंबानींच्या या कंपनीची कमाल, शेअरनं 4 वर्षांत दिला 700% परतावा; रॉकेट स्पीडनं करतोय मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 4:59 PM

कंपनीचा शेअर गुरुवारी 13% च्या वृद्धीसह 1543.90 रुपयांवर पोहोचला आहे.

शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या (RIIL) शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर गुरुवारी 13% च्या वृद्धीसह 1543.90 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1604 रुपये एवढा आहे. तर नीचांक 723 रुपये एवढा आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स उद्योग समूहाचा एक भाग आहे.

4 वर्षांत 700% ची तेजी -रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चरचा (RIIL) शेअर गेल्या 4 वर्षांत 700% ने वधारला आहे. हा शेअर 27 मार्च 2020 रोजी 194 रुपयांवर होते. तो 15 फेब्रुवारी 2024 रोजी 1543.90 रुपयांवर पोहोचला. तर बुधवारी हा शेअर 1356 रुपयांवर बंद झाला. गेल्या 3 वर्षात या रिलायन्स ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये 300% वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 384.80 रुपयांवरून 1543.90 रुपयांपर्यंत वधारला आहे.

11 महिन्यात 110% हून अधिकचा परतावा - रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा ​​शेअर गेल्या 11 महिन्यांत 110% पेक्षाही अधिक वाढला आहे. 28 मार्च 2023 रोजी कंपनीचा शेअर 732.90 रुपयांवर होता. 15 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर्स 1543.90 रुपयांवर पोहोचला आहे. 

गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, कंपनीच्या शेअरने 55% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. या काळात कंपनीचा शेअर 966.60 रुपयांवरून 1543.90 रुपयांपर्यंत वधारला. या स्मॉलकॅप कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 2240 कोटी रुपये एवढे आहे. तर कंपनीतील प्रवर्तकांचा वाटा 45.43 टक्के एवढा आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारमुकेश अंबानीगुंतवणूक