Join us  

मुलाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानी यांना लागला 14,91,862,00,000 रुपयांचा जॅकपॉट; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 10:19 PM

येत्या 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाह बंधनात अडकणार आहेत.

Mukesh Ambani Reliance : दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी सध्या त्यांच्या मुलाच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. येत्या 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, या सोहळ्यापूर्वी मुकेश अंबानी यांच्या हाती जॅकपॉट लागला. सोमवारी(दि.8) अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्सचे विक्रमी पातळीवर पोहोचले.

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सोमारी नवा विक्रम केला. कंपनीचे शेअर्स 3,200 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. 3,200 रुपयांची पातळी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, आजच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्सनी 3,217.90 रुपयांचा उच्चांक गाठला. चालू वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 24 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

मार्केट कॅप 15 हजार कोटींनी वाढलीआपण कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल बोललो, आकडेवारीनुसार बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 21,66,481.18 कोटी रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 21,51,562.56 कोटी रुपये होते. याचा अर्थ सोमवारी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 14,918.62 कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात कंपनीच्या मार्केट कॅप 32,611.36 कोटींनी वाढले आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :मुकेश अंबानीअनंत अंबानीव्यवसायगुंतवणूकशेअर बाजार