Lokmat Money >शेअर बाजार > मुकेश अंबानींची 'ही' कंपनी पहिल्यांदाच देणार डिविडेंड, समोर आली नवी टार्गेट प्राईज

मुकेश अंबानींची 'ही' कंपनी पहिल्यांदाच देणार डिविडेंड, समोर आली नवी टार्गेट प्राईज

पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती देणार डिविडेंड. तुमच्याकडे आहे का हा शेअर?

By जयदीप दाभोळकर | Updated: April 19, 2025 15:06 IST2025-04-19T15:05:03+5:302025-04-19T15:06:41+5:30

पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती देणार डिविडेंड. तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Mukesh Ambani s Jio Financial company will pay dividend for the first time new target price revealed | मुकेश अंबानींची 'ही' कंपनी पहिल्यांदाच देणार डिविडेंड, समोर आली नवी टार्गेट प्राईज

मुकेश अंबानींची 'ही' कंपनी पहिल्यांदाच देणार डिविडेंड, समोर आली नवी टार्गेट प्राईज

Jio Financial share price: मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शिअलनं तिमाही निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत कंपनीची संमिश्र कामगिरी दिसून आली. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) झपाट्यानं वाढ झालीये. आता प्रश्न असा आहे की, या शेअरमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल की नाही?

तज्ज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये सोमवारी हालचाली दिसू शकतात. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत कोणतीही घसरण झाल्यास गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची चांगली संधी मिळेल. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर दीर्घ मुदतीत ३५० रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या

कंपनी आहे चर्चेत

'रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा वार्षिक आणि मार्च तिमाहीत संमिश्र परिणाम आला. तथापि, कंपनीच्या मालमत्ता व्यवस्थापनात वाढ आणि लाभांश घोषणा सकारात्मक अपडेट्स आहेत,” अशी प्रतिक्रिया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तिमाही निकालांवर बोलताना एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेव म्हणाल्या. 

मार्च तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा निव्वळ नफा ३१६ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा निव्वळ नफा ३१६ कोटी रुपये होता. तर गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला १६१३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा नफा १६०५ कोटी रुपये होता. कंपनीचा एयूएम वाढून १०,०५३ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा केवळ १७३ कोटी रुपये होता.

दरम्यान, कंपनीनं आता डिविडेंड देण्याचीही घोषणा केली आहे. कंपनीकडून पहिल्यांदाच डिविडेंड दिला जाणार आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर ५० पैशांचा डिविडेंड देणार आहे.

Web Title: Mukesh Ambani s Jio Financial company will pay dividend for the first time new target price revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.