Lokmat Money >शेअर बाजार > Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे होणार डी-मर्जर, २९००₹ पर्यंत जाणार शेअरची किंमत

Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे होणार डी-मर्जर, २९००₹ पर्यंत जाणार शेअरची किंमत

बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 02:09 PM2023-03-31T14:09:54+5:302023-03-31T14:11:03+5:30

बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.

Mukesh Ambani s Reliance will be de merged share price will go up to 2900 rs jio financial services | Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे होणार डी-मर्जर, २९००₹ पर्यंत जाणार शेअरची किंमत

Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे होणार डी-मर्जर, २९००₹ पर्यंत जाणार शेअरची किंमत

बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (Reliance Industries Limited) आपला आर्थिक सेवा (Financial Services) व्यवसाय वेगळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या उद्देशानं कंपनीनं २ मे २०२३ रोजी कर्जदार आणि भागधारकांची बैठक आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या वृत्तादरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर शुक्रवारी ३ टक्क्यांनी वाढला आणि तो कामकाजादरम्यान २३०० रुपयांच्या वर व्यवहार करत होता.

या बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांच्या वित्तीय सेवा व्यवसायाच्या डी-मर्जर योजनेला मंजुरी देईल. हा व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्सपासून वेगळा होईल. हे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या (Jio Financial Services) नावाने डी-मर्ज केलं जाईल आणि त्यानंतर स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जाईल. हे डी-मर्जर शेअर-स्वॅप व्यवस्थेद्वारे केलं जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरमागे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक शेअर मिळेल.

३१ मार्च २०२२ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचा वित्तीय सेवा व्यवसाय १३८७ कोटी रुपये होता. केव्ही कामथ हे नवीन कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन असतील. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डानं नोव्हेंबर २०२२ मध्ये डी-मर्जरला मान्यता दिली होती. सध्या Jio Financial Services ही रिलायन्स इंडस्ट्रीजची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

एक्सपर्ट बुलिश
रिलायन्सच्या शेअरबाबत एक्स्पर्ट्स बुलिश दिसून येत आहेत. जेएम फायनान्शियलने या शेअरसाठी २९०० रुपयांचे टार्गेट प्राईज दिले आहे. २९ एप्रिल २०२२ रोजी शेअरची किंमत २८५५ रुपयांवर गेली होती. ही ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी होती. त्याच वेळी, २० मार्च रोजी, शेअर २,१८० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला.

(टीप - यात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Mukesh Ambani s Reliance will be de merged share price will go up to 2900 rs jio financial services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.