Mukesh Ambani Shares : तुम्ही शेअर बाजारातगुंतवणूक करत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या अशा काही कंपन्या आहेत, ज्यांच्या शेअरची किंमत 60 रुपयांपेक्षा कमी आहे. यापैकी तीन कंपन्या आलोक इंडस्ट्रीज, हॅथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड आणि डेन नेटवर्क्स लिमिटेडबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आलोक इंडस्ट्रीज टेक्सटाईल क्षेत्रातील कंपनी आहे, तर हॅथवे केबल आणि डेन नेटवर्क्स टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि सॉफ्टवेअर उत्पादन उद्योगाशी संबंधित आहेत. मंगळवारी(30 सप्टेंबर) या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्सना मोठी मागणी होती. गांधी जयंतीनिमित्त आज, बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद आहे.
आलोक इंडस्ट्रीज
मंगळवारी आलोक इंडस्ट्रीजचा शेअर 27.24 रुपयांवर बंद झाला. हा स्टॉक एका दिवसाच्या आधीच्या तुलनेत 2.56% अप्पर सर्किटवर बंद झाला. जानेवारी 2024 मध्ये शेअर 39.24 रुपयांवर पोहोचला होता. प्रवर्तकांकडे कंपनीत 75 टक्के हिस्सा आहे, तर सार्वजनिक भागधारकांकडे 25 टक्के हिस्सा आहे. प्रवर्तकांमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडे 40.01 टक्के हिस्सा किंवा 1,98,65,33,333 शेअर्स आहेत. तर, जेएम फायनान्शियल ॲसेट्सकडे कंपनीचे 1,73,73,11,844 शेअर्स आहेत. हे 34.99 टक्के आहे.
डेन नेटवर्क्स
मंगळवारी DEN नेटवर्क्स लिमिटेडचे शेअर्स 4.22% वाढून 54.88 रुपयांवर बंद झाले. व्यवहारादरम्यान हा शेअर 5 टक्क्यांहून अधिक वाढून 55.49 रुपयांवर पोहोचला होता. जानेवारी 2024 मध्ये शेअर 69.40 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाले, तर प्रवर्तकाची एकूण हिस्सेदारी 74.90 टक्के आहे. या कंपनीत रिलायन्स इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड, रिलायन्स व्हेंचर्स लिमिटेड आणि नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे स्टेक आहेत. यासोबतच, Jio Television Distribution Holdings Private Limited, Jio Futuristic Digital Holdings Private Limited आणि Jio Digital Distribution Holdings Private Limited यांचाही कंपनीत हिस्सा आहे.
हॅथवे केबल आणि डेटाकॉम लिमिटेड
BSE वर या कंपनीच्या शेअरची किंमत 20.89 रुपये आहे. गेल्या मंगळवारी स्टॉक 2 टक्क्यांहून अधिक वाढला होता. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 27.90 रुपये आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे तर, प्रवर्तकांकडे 75 टक्के आणि सार्वजनिक भागधारकांकडे 25 टक्के आहे. प्रवर्तकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज - जिओ कंटेंट डिस्ट्रिब्युशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, जिओ इंटरनेट डिस्ट्रिब्युशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ केबल आणि ब्रॉडबँड होल्डिंग यांचा समावेश आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)