Join us

मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 14:34 IST

Share Market : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात फक्त ३ दिवस व्यवहार झाले. पण या फक्त ३ दिवसांत देशातील टॉप १० कंपन्यांनी चांगला नफा कमावला.

Share Market  : डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफला ३ महिन्यांसाठी स्थिगिती दिल्यानंतर भारतीय शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात फक्त ३ दिवस व्यवहार झाले. पण, या दिवसात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्ससह टीसीएस, बजाज फायनान्स सारख्या कंपन्यांची प्रचंड नफा कमावला. परिणामी शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली. एका आठवड्यात टॉप १० कंपन्यांनी एकत्रितपणे ३.८४ लाख कोटी रुपये कमावले.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी दिसून आली, ज्यामुळे देशातील टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली. गेल्या आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स ३,३९५ अंकांने वाढला, तर एनएसई निफ्टी देखील १,०२३ अंकांनी वर गेला, ज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील कर्जदार एचडीएफसी बँकेला सर्वाधिक नफा झाला.

या कारणांमुळे बाजारात वाढरेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे ​​वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, "देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील अनुकूल संकेतांमुळे आणि सुट्ट्यांमुळे कमी ट्रेडिंग आठवड्यातही बाजार जोरदारपणे सावरला आणि ४.५ टक्क्यांहून अधिक वाढला." ते पुढे म्हणाले, "ही वाढ टॅरिफवरील तात्पुरत्या बंदीमुळे आणि काही निवडक वस्तूंना टॅरिफ यादीतून बाहेर ठेवल्यामुळे झाली आहे. यामुळे येत्या काळात व्यापार चर्चेची शक्यता आणखी वाढली आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावरील परिणाम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो."

वाचा - अमेरिका, जर्मनी, चीन... सगळेच मागे, जगात सर्वाधिक सोने कोणाकडे? आकडा वाचून धक्का बसेल

या कंपन्यांचे मार्केट कॅप सुधारले

  • एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप ७६,४८३.९५ कोटी रुपयांनी वाढून १४,५८,९३४.३२ कोटी रुपयांवर पोहोचले, जे आठवड्यातील सर्वात मोठी वाढ आहे.
  • भारती एअरटेलने ७५,२१०.७७ कोटी रुपयांच्या वाढीसह त्यांचे मार्केट कॅप १०,७७,२४१.७४ कोटी रुपयांपर्यंत वाढवले.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप ७४,७६६.३६ कोटी रुपयांनी वाढून १७,२४,७६८.५९ कोटी रुपये झाले.
  • आयसीआयसीआय बँकेला ६७,५९७ कोटी रुपयांचा नफा झाला. बँकेच मार्केट कॅप आता १०,०१,९४८.८६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे मूल्य ३८,४२०.४९ कोटी रुपयांनी वाढून ७,११,३८१.४६ कोटी रुपये झाले.
  • टीसीएसचे मूल्य २४,११४.५५ कोटी रुपयांनी वाढून ११,९३,५८८.९८ कोटी रुपये झाले.
  • बजाज फायनान्सचे मार्केट कॅप १४,७१२.८५ कोटी रुपयांनी वाढून ५,६८,०६१.१३ कोटी रुपयांवर पोहोचले.
  • आयटीसीचे मार्केट कॅप ६,८२०.२ कोटी रुपयांनी वाढून ५,३४,६६५.७७ कोटी रुपये झाले.
  • इन्फोसिसचे मूल्य ३,९८७.१४ कोटी रुपयांनी वाढून ५,८९,८४६.४८ कोटी रुपये झाले.
  • याशिवाय, हिंदुस्तान युनिलिव्हरचे मूल्य १,८९१.४२ कोटी रुपयांनी वाढून ५,५७,९४५.६९ कोटी रुपयांवर पोहचलं.
टॅग्स :शेअर बाजाररिलायन्सटाटाआयसीआयसीआय बँकएचडीएफसी