शेअर बाजारात एका छोट्या कंपनीच्या शेअरने गेल्या केवळ 4 वर्षातच जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचे नाव आहे ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर. या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 4 वर्षात तब्बल 19000% पेक्षाही अधिक वाढ झाली आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर या काळात 2 रुपयांवरून 400 रुपयांपर्यंत वाढला आहेत. ऑथम इन्व्हेस्टमेंटच्या शेअरने 4 वर्षांत लखपती गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे.
1 लाखाचे केले 1.9 कोटी रुपये - ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 13 सप्टेंबर 2019 रोजी 2.13 रुपयांवर होता. तो 28 सप्टेंबर 2023 रोजी 402.20 रुपयांवर बंद झाला. ऑथम इन्व्हेस्टमेंटच्या शेअरने गेल्या 4 वर्षांत 19800 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 13 सप्टेंबर 2019 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि कायम ठेवली असती, तर आता त्याची व्हॅल्यू 1.98 कोटी रुपये झाली असती.
3 वर्षांत 3300% हून अधिकचा परतावा -ऑथम इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या 3 वर्षांत झपाट्याने वाढला आहे. 11 सप्टेंबर 2020 रोजी कंपनीचा शेअर 11.54 रुपयांवर होते. तो 28 सप्टेंबर 2023 रोजी 402.20 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत 3385% परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 11 सप्टेंबर 2020 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती कायम ठेवली असती, तर त्यांची आताची व्हॅल्यू 34.85 लाख रुपये झाली असती.
ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 580 रुपये आहे. तर, निचांक 154.50 रुपये एवढा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)