Join us  

Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 2:17 PM

Multibagger Jeena Sikho Lifecare share price : शनिवारी कंपनीचा शेअर १,१७५ रुपयांवर बंद झाला. मार्केट एक्सपर्टच्या मते, येत्या काही दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते.

Multibagger Jeena Sikho Lifecare share price : जीना सिखो लाइफकेअरचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. शनिवारी कंपनीचा शेअर १,१७५ रुपयांवर बंद झाला. मार्केट एक्सपर्टच्या मते, येत्या काही दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते. देशांतर्गत ब्रोकरेज कंपनी नुवामा प्रोफेशनल क्लायंट ग्रुपनं शेअरवर 'बाय' रेटिंग दिलं असून १,६५० रुपयांच्या टार्गेट प्राइससह शेअरवर कव्हरेज सुरू केलं. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, यात ४७ टक्क्यांपर्यंत वाढ दिसू शकते आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्टॉक खरेदी केला जाऊ शकतो. 

लिस्टिंगपासून नफा 

जीना सिखो लाईफकेअर गेल्या वर्षभरापासून दमदार नफा देत आहे. जीना सिखो लाईफकेअरच्या शेअरची किंमत २०२४ मध्ये आतापर्यंत जवळपास ८८ टक्क्यांनी वाढली आहे. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, १९ एप्रिल २०२२ रोजी लिस्टिंग झाल्यापासून या शेअरमध्ये १,३१५.५२% आणि गेल्या वर्षभरात ५३९.२२% वाढ झाली आहे. या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत १,२२६.८० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १७५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २,९२१.०७ कोटी रुपये आहे. 

कंपनीबद्दल माहिती 

जीना सिखो लाईफकेअर या भारतातील अव्वल आयुर्वेदिक आरोग्य सेवा संस्थांपैकी एक असलेली कंपनी मनीष ग्रोव्हर यांनी २०१७ मध्ये स्थापन केली होती. ते आचार्य मनीषजी या नावानेही ओळखले जातात. २००९ पासून मनीष ग्रोव्हर यांनी आयुर्वेदाशी संबंधित वस्तू आणि सेवांचा प्रचार केला आहे. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीद्वारे (आयुष) प्रदान केलेल्या वाढीच्या संधींचा लाभ घेण्यासाठी जीना सिखो लाईफकेअर आदर्श स्थितीत आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक