Lokmat Money >शेअर बाजार > 24000% चा बम्पर परतावा, 7 रुपयांवरून 1700 वर पोहोचला हा शेअर; 1 लाखाचे झाले 2.4 कोटी! 

24000% चा बम्पर परतावा, 7 रुपयांवरून 1700 वर पोहोचला हा शेअर; 1 लाखाचे झाले 2.4 कोटी! 

...कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 24000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत केईआय इंडस्ट्रीजचे शेअर्स 7 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वधारले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 06:23 PM2023-04-03T18:23:19+5:302023-04-03T18:23:54+5:30

...कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 24000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत केईआय इंडस्ट्रीजचे शेअर्स 7 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वधारले आहेत.

Multibagger kei industries share delivered bumper return of 24000% the stock rose from Rs 7 to Rs 1700 in just 10 years | 24000% चा बम्पर परतावा, 7 रुपयांवरून 1700 वर पोहोचला हा शेअर; 1 लाखाचे झाले 2.4 कोटी! 

24000% चा बम्पर परतावा, 7 रुपयांवरून 1700 वर पोहोचला हा शेअर; 1 लाखाचे झाले 2.4 कोटी! 

होम वायर आणि हाय व्होल्टेज वायर तयार करणाऱ्या केईआय इंडस्ट्रीजच्या शेअरने गेल्या 10 वर्षांपेक्षाही कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 24000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत केईआय इंडस्ट्रीजचे शेअर्स 7 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वधारले आहेत. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1744 रुपये एवढा आहे. तर 52 आठवड्यांतील नीचांक 1040 रुपये एवढा आहे.

कंपनीच्या शेअरने केले 1 लाखाचे 2.4 कोटी -
केईआय इंडस्ट्रीजचा (KEI Industries) शेअर 16 ऑगस्ट 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 7 रुपयांवर व्यवहार करत होते. यानंतर 3 एप्रिल 2023 रोजी हा शेअर BSE वर Rs.1696 वर पोहोचला आहे. KEI इंडस्ट्रीजच्या शेअरने 10 वर्षांपेक्षाही कमी काळात 24125% एवढा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 16 ऑगस्ट 2013 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 2.42 कोटी रुपये झाले असते.

फक्त 3 वर्षांतच केईआय इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 470% ची उसळी -
केईआई इंडस्ट्रीजच्या (KEI Industries) शेअरने गेल्या 3 वर्षांतही जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 3 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 295.80 रुपयांना होता. हा शेअर 3 एप्रिल 2023 रोजी Rs.1696 वर ट्रेडिंग करत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 3 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, आता त्याचे 5.73 लाख रुपये झाले असते.

केईआई इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 15272 कोटी रुये आहे. तर डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा रेव्हेन्यू 1784.32 कोटी रुपये होता. कंपनीला डिसेंबर तिमाहीत 128.61 कोटी रुपयांचा तिमाही नफा झाला होता.
 

Web Title: Multibagger kei industries share delivered bumper return of 24000% the stock rose from Rs 7 to Rs 1700 in just 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.