Lokmat Money >शेअर बाजार > अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये...

अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये...

Multibagger Penny Stock: अल्पावधीत या शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:54 IST2025-02-21T15:54:42+5:302025-02-21T15:54:42+5:30

Multibagger Penny Stock: अल्पावधीत या शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

Multibagger Penny Stock: A share worth just Rs 13.40 reached 2000; Rs 1 lakh became Rs 1.49 crore.. | अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये...

अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये...

Multibagger Penny Stock: शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे, पण कधी-कधी असा शेअर हाती लागतो, जो अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल करतो. असाच एक शेअर इंडो थाई सिक्युरिटीजचा आहे. या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ झाली. पाच वर्षांपूर्वी कंपनीचा शेअर फक्त 13.40 रुपयांवर ट्रेडिंग करत होता, तो आज 14,825% च्या वाढीसह 2 हजार रुपयांवर पोहोचला आहे. 

सध्या बाजारात विक्रीचा मोठा दबाव असला तरीही, चालू वर्षात स्टॉक 53 टक्के वाढला आहे. स्टॉकने गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने वाढ नोंदवली आहे. सप्टेंबरमध्ये यात सर्वाधिक मासिक वाढ 80.46% नोंदवली गेली, तर ऑगस्टमध्ये हा शेअर 55.51% वाढला होता.

किंमत वाढून 1.49 कोटी रुपये झाली 
एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती, तर त्याचे मूल्य 1.49 कोटी रुपये झाले असते. 

शेअरची कामगिरी
गेल्या एका महिन्यात इंडो थाई सिक्युरिटीजचे शेअर्स 1.65 टक्क्यांनी वाढले आहेत. तर, एका वर्षात 506.52 टक्के वाढ झाली आहे. तर, कंपनीच्या शेअर्समध्ये 5 वर्षांत 8233.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्रेडिंग दरम्यान कंपनीचे मार्केट कॅप BSE वर 2,031.66 कोटी रुपये होते.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Multibagger Penny Stock: A share worth just Rs 13.40 reached 2000; Rs 1 lakh became Rs 1.49 crore..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.