Join us

शेअर असावा तर असा, ५ वर्षांत ₹१ लाखाचे झाले ₹१ कोटी; गुंतवणूकदारांना मिळालं धीराचं बक्षीस

By जयदीप दाभोळकर | Updated: March 19, 2025 15:19 IST

Multibagger Penny Stock: शेअर बाजारात पैसा कमावणं खूप सोपं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे जाणून घ्या की ते तितके सोपे नाही. शेअर बाजारात चांगला नफा कमावण्यासाठी चांगलं संशोधन आणि संयम आवश्यक आहे.

Multibagger Penny Stock: शेअर बाजारात पैसा कमावणं खूप सोपं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे जाणून घ्या की ते तितके सोपे नाही. शेअर बाजारात चांगला नफा कमावण्यासाठी चांगलं संशोधन आणि संयम आवश्यक आहे. असाच एक मल्टिबॅगर स्टॉक म्हणजे सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स (CG Power). गेल्या पाच वर्षांत या शेअरनं १०,९२३ टक्क्यांची वाढ नोंदवलीये. जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ही रक्कम आज १.०९ कोटी रुपयांवर पोहोचली असती. कारण, २०२० मध्ये सीजी पॉवरच्या शेअरची किंमत फक्त ५.८५ रुपये होती, पण आज बीएसईवर हा शेअर ६५० रुपयांवर ट्रेड करत आहे.

शेअर प्राईज ट्रेंड

बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सीजी पॉवरच्या शेअरचा भाव २.३४ टक्क्यांनी वधारून ६५० रुपयांवर व्यवहार करत होता. हा शेअर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. गेल्या २५ वर्षांत या शेअरनं १३,९८७ टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरनं ३५ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या शेअरमध्ये कमालीचा अस्थिरता दिसून आली. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर ११.५६ टक्क्यांनी घसरला असला तरी गेल्या महिनाभरात ११.३७ टक्क्यांनी वधारला आहे. वर्षभराची आकडेवारी (YTD) पाहिली तर हा शेअर १२.२३ टक्क्यांनी घसरला असून तो ७४१ रुपयांच्या पातळीखाली येऊन सध्याच्या किमतीवर पोहोचलाय.

लाभांशाची घोषणा

सीजी पॉवरनं मंगळवारी (१८ मार्च २०२५) संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति शेअर १.३० रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला. हा लाभांश शेअरच्या फेस व्हॅल्यूच्या ६५% (प्रति शेअर २ रुपये) आहे. कंपनीनं २२ मार्च २०२५ ही विक्रमी तारीख निश्चित केली आहे, म्हणजेच या तारखेपर्यंत हे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश मिळेल. लाभांश १६ एप्रिल २०२५ रोजी किंवा त्यानंतर दिला जाईल.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक