Multibagger Penny Stock :शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना बंपर परतावा देतात. अशाच स्टॉक्समध्ये मोनोटाइप इंडियाचाही समावेश आहे. सोमवारी कंपनीचे शेअर्स ₹2.38 वर आले. मत्वाची बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षांत मोनोटाइप इंडियाच्या शेअर्समध्ये 621 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये या शेअरची किंमत फक्त ₹0.33(33 पैसे) होती, जी आता वाढून ₹2.38 झाली आहे.
किंमतीत सातत्याने वाढ
मोनोटाइप इंडियाच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात स्टॉकमध्ये 324 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर 2024 मध्ये आतापर्यंत 213 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या सात महिन्यांपासून मल्टीबॅगर शेअर सातत्याने वाढत आहे. नोव्हेंबरमध्ये 103 टक्के वाढ आणि ऑक्टोबरमध्ये 1 टक्के वाढ झाल्यानंतर डिसेंबरमध्ये जवळपास 25 टक्के वाढ झाली आहे. मोनोटाइप इंडियाच्या शेअर्सने अलीकडेच ₹2.42 चा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. शिवाय, एप्रिल 2024 मध्ये नोंदवल्या गेलेल्या ₹0.54 च्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरुन स्टॉक 341 टक्क्यांनी वाढला आहे.
मोनोटाइप इंडिया सप्टेंबर तिमाही निकाल
मोनोटाइप इंडियाचा निव्वळ नफा सप्टेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत 99.33% वाढून ₹2.99 कोटी झाला, जो मागील वर्षी याच कालावधीत ₹1.50 कोटी होता. कंपनीच्या विक्रीत 1083.64% ची अभूतपूर्व वाढ झाली आहे.
कंपनी काय करते?
मोनोटाइप इंडिया लिमिटेड ही मुंबई स्थित कंपनी आहे. ही 1974 पासून कार्यरत आहे. कंपनी स्टॉक, बाँड आणि इतर सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीसह आर्थिक आणि गुंतवणूक सेवा देखील पुरवते.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)