Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Penny Stock : मस्तच! १७ रुपयांच्या शेअरने केले १ लाख; परदेशी कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याचा परिणाम

Multibagger Penny Stock : मस्तच! १७ रुपयांच्या शेअरने केले १ लाख; परदेशी कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याचा परिणाम

शेअर मार्केट पैसे गुंतवण्याचे महत्वाचे माध्यम आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन अनेकांना फायदा झाला. पण, काहीवेळा यात तोट्यालाही सामोरे जावे लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 01:43 PM2022-11-06T13:43:09+5:302022-11-06T13:43:35+5:30

शेअर मार्केट पैसे गुंतवण्याचे महत्वाचे माध्यम आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन अनेकांना फायदा झाला. पण, काहीवेळा यात तोट्यालाही सामोरे जावे लागते.

Multibagger Penny Stock lakh per share at Rs 17 Effect of buying a large share in a foreign company | Multibagger Penny Stock : मस्तच! १७ रुपयांच्या शेअरने केले १ लाख; परदेशी कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याचा परिणाम

Multibagger Penny Stock : मस्तच! १७ रुपयांच्या शेअरने केले १ लाख; परदेशी कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याचा परिणाम

शेअर मार्केट पैसे गुंतवण्याचे महत्वाचे माध्यम आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन अनेकांना फायदा झाला. पण, काहीवेळा यात तोट्यालाही सामोरे जावे लागते. स्टॉकचा अभ्यास करुन गुंतवणूक केल्यास तुम्ही फायद्यात राहता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वस्तात मिळणाऱ्या स्टॉक संदर्भात सांगणार आहोत. (Multibagger Penny Stock ) 

हा स्टॉक फिलाटेक्स फॅशनचा आहे. या स्टॉकची किंमत १९ रुपयांपेक्षा कमी आहे, एका वर्षात तुम्हाला मोठा फायदा मिळवून देते. या आठवड्यातील मजबूत कामगिरीमुळे या समभागातील गुंतवणूकदारांची संपत्ती तिपटीने वाढली आहे. कंपनी एक स्मॉलकॅप स्टॉक आहे. या आठवड्यात स्टॉकने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.

Multibagger Share Investment : २०₹ चा शेअर १३९०₹ पोहोचला, तीन वर्षांतच गुंतवणूकदार मालमाल

शुक्रवारी, Philatex चे शेअर्स BSE वर ३.४७% वाढून १७.९० रुपये वर बंद झाले. या समभागाने आदल्या दिवशी १८.१५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांक गाठला होता, जो ५ % वर होता. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी बीएसईवर स्टॉक ५ रुपयांच्या जवळही नव्हता. याच दिवशी शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता ३३३.१७% (५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून) परतावा मिळाला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने ४ नोव्हेंबर २०२१ रोजी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे आज ४.३३ लाख रुपये झाले असते.

गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी समभाग ३.८६ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. १ वर्षाच्या नीचांकी स्तरावर, Filatex Fashion चे शेअर्स सध्या BSE वर ३७०.२१ % वर आहेत. या वेळेत ज्यांनी १ लाख रुपये गुंतवले त्यांना आता एका वर्षापेक्षा कमी वेळेत  ३.७० लाखांपेक्षा जास्त नफा झाला आहे. यासह ही रक्कम ४.७० लाखांहून अधिक झाली आहे.

३ नोव्हेंबर रोजी श्रीलंकास्थित इसाबेला प्रायव्हेट लिमिटेड मधील ५१% बहुसंख्य स्टेक खरेदी करण्याच्या ऑफरनंतर Filatex Fashion स्टॉकमध्ये तेजी आली आहे. इसाबेला श्रीलंकेत पोशाख आणि संबंधित उत्पादनांच्या निर्मितीच्या व्यवसायात आहे. तसेच, दुसर्‍या एक्सचेंज फाइलिंगमध्ये, Filatex ने ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीतील आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणारी बोर्ड बैठक आयोजित केली आहे.  (Multibagger Penny Stock ) 

Web Title: Multibagger Penny Stock lakh per share at Rs 17 Effect of buying a large share in a foreign company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.