Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Penny Stock: ५० पैशांच्या शेअरची कमाल; १२२२ टक्क्यांचा रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Multibagger Penny Stock: ५० पैशांच्या शेअरची कमाल; १२२२ टक्क्यांचा रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केलं मालामाल

केवळ ५० पैशांच्या शेअरने आतापर्यंत १२२२ टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. सलग ३ सत्रांमध्ये या शेअरला अप्पर सर्किट लागलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:05 PM2024-06-24T15:05:10+5:302024-06-24T15:05:31+5:30

केवळ ५० पैशांच्या शेअरने आतापर्यंत १२२२ टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. सलग ३ सत्रांमध्ये या शेअरला अप्पर सर्किट लागलंय.

Multibagger Penny Stock Max of 50 paisa penny share Investors huge return 1222 percent investment stock market | Multibagger Penny Stock: ५० पैशांच्या शेअरची कमाल; १२२२ टक्क्यांचा रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Multibagger Penny Stock: ५० पैशांच्या शेअरची कमाल; १२२२ टक्क्यांचा रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Multibagger Penny Stock: केवळ ५० पैशांच्या शेअरने आतापर्यंत १२२२ टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. सलग ३ सत्रांमध्ये या शेअरला अप्पर सर्किट लागलंय. आम्ही वामा इंडस्ट्रीजबद्दल बोलत आहोत. हा पेनी स्टॉक आज १० टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह उघडला. आता तो ६.६१ रुपयांवर पोहोचला आहे. ७४ कोटी ३२ लाख रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर वामा इंडस्ट्रीजच्या शेअर्सना आज अपर सर्किट लागलंय.

तेजीचं कारण काय?

वामा इंडस्ट्रीजला ७४.३२ कोटी रुपयांची सप्लाय ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी वधारला. दरम्यान, ४,७४४,५८० शेअर्सच्या खरेदी ऑर्डर प्रलंबित होत्या. वामाचे शेअर्सच्या विक्रीसाठी कोणीही नव्हते. 

डब्ल्यूएएमएच्या शेअरच्या प्राईज हिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर शेअरनं २१ फेब्रुवारी २०२४ रोजी ७.२ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी आणि २६ ऑक्टोबर २०२३ रोजी ४ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला आहे. हा शेअर सध्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा ८.१९ टक्क्यांनी खाली आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ६५.२५ टक्क्यांच्या तेजीसह काम करत आहे. गेल्या तीन दिवसांत शेअरच्या किंमतीत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यात २६ टक्के आणि ६ महिन्यांत ३८ टक्के परतावा दिला आहे. ६ फेब्रुवारी २००४ रोजी कंपनीच्या शेअरची किंमत ५० पैसे होती.

काय करते कंपनी?

वामा इंडस्ट्रीज लिमिटेड प्रामुख्यानं आयटी आणि आयटीईएसमध्ये व्यवहार करते. ही कंपनी सरकार, उद्योग, व्यवसाय किंवा संगणक प्रणाली, दळणवळण प्रणाली किंवा संगणक आणि कम्युनिकेशन प्रणालींच्या संयोजनाच्या इतर क्षेत्रांमध्ये वापरण्यासाठी सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअर सिस्टमची सिस्टम स्टडी, अॅनालिटिक्स डिझाइन, डेव्हलपमेंट आणि एक्झिक्युशनचं काम करते.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Multibagger Penny Stock Max of 50 paisa penny share Investors huge return 1222 percent investment stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.