Join us

Multibagger Penny Stocks: 'या' पेनी स्टॉकवर परदेशी गुंतवणूकदार फिदा, महिन्याभरात दुप्पट झाले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 3:22 PM

Multibagger Penny Stocks: महिनाभरापूर्वी केवळ ९.२० रुपये असलेला हा शेअर आजच्या घडीला १८.९० रुपयांवर पोहोचलाय. या शेअरनं आपल्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य २.०५ लाख रुपये केलं

Multibagger Penny Stocks: महिनाभरापूर्वी केवळ ९.२० रुपये असलेला हा शेअर आजच्या घडीला १८.९० रुपयांवर पोहोचलाय. आम्ही बोलत आहोत पेनी स्टॉक रतन इंडिया पॉवर लिमिटेडबद्दल. या शेअरनं आपल्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य २.०५ लाख रुपये केलं असून, या कालावधीत गुंतवणूकदारांना १०५ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. एवढंच नव्हे तर गेल्या पाच दिवसांत चार वेळा या शेअरला अपर सर्किटही लागलंय. यात गुंतवणूकदारांना २० टक्के परतावा मिळालाय. 

वर्षभरात १ लाख झाले ५.६५ लाख 

वर्षभरात ४६४ टक्क्यांहून अधिक परतावा देत हा शेअर मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीत सामील झाला आहे. ज्याने वर्षभरापूर्वी रतन इंडियाचे शेअर्स ३.३५ रुपयांना विकत घेऊन एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य आता ५.६५ लाख रुपये होईल. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९.१५ रुपयांवर आणि ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर ३.१५ रुपये आहे. 

परदेशी गुंतवणूकदारांच्या उड्या 

मार्च तिमाहीपर्यंत प्रवर्तकांचा हिस्सा ४४.०६ टक्के होता. त्यापैकी ८८.६५ टक्के शेअर्स गहाण आहेत. परदेशी गुंतवणूकदार या पेनी स्टॉककडे इतके आकर्षित झाले आहेत की, डिसेंबर तिमाहीतील ०.७६ टक्क्यांवरून शेअरहोल्डिंग २.०४ टक्क्यांवर नेण्यात आलंय आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही आपला हिस्सा ०.०९ टक्क्यांवरून ०.११ टक्क्यांवर नेला. यात म्युच्युअल फंडांचा मोठा वाटा आहे. इतरांकडे ५३.७९ टक्के हिस्सा आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक