Multibagger penny stock: छोट्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं असतं. परंतु अनेकदा हे पेनी स्टॉक्स आपल्याला भरपूर रिटर्न देतात. आज आपण ज्या शेअरबद्दल बोलत आहोत त्याने केवळ 5 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना तुफान परतावा दिला आहे. हा शेअर पल्सर इंटरनॅशनलचा (Pulsar International) आहे. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून कंपनीच्या शेअर्सना सातत्यानं अपर सर्किट लागत आहे. बुधवारी या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेजी दिसून आली होती. तसंच हा शेअर 45.09 रुपयांवर बंद झाला. याबाबत जाणून घेऊया सविस्तर.
पल्सर इंटरनॅशनलच्या शेअर्सनं गेल्या पाच दिवसांत 21 टक्क्यांपेक्षा जास्त नफा दिला आहे. तर, गेल्या एका महिन्यात, पल्सर इंटरनॅशनलच्या स्टॉकनं 165 टक्क्यांपर्यंत परतावा दिलाय. एका महिन्यात हा शेअर 17 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढला आहे. गेल्या पाच महिन्यांबद्दल बोलायचं झाल्यास या शेअरनं 1,794.54 टक्क्यांचा चा मजबूत परतावा दिला. यादरम्यान हा शेअर 2.38 रुपयांवरून 45.09 रुपयांपर्यंत वाढला आहे.
या वर्षी YTD बद्दल बोलायचं झाल्यास, जानेवारी 2023 पासून 1,024.44 टक्क्यांचा परतावा दिला. या काळात या शेअरची किंमत 4 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत गेली आहे. त्याच वेळी, या स्टॉकनं एका वर्षात 2,078.26 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. या दरम्यान, तो 2.07 रुपयांवरून 45.09 रुपयांपर्यंत वाढला आहे.
गुंतवणूकदारांना मोठा नफा
पल्सर इंटरनॅशनलच्या शेअरच्या प्राईज हिस्ट्रीनुसार जर एखाद्या गुंतवणूकदारानं महिन्यापूर्वी यात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याचं मूल्य महिन्याभरात 2.70 लाख रुपये झालं असतं. त्याच वेळी, गेल्या पाच महिन्यांत एक लाखाची गुंतवणूक 23 लाख रुपयांपर्यंत वाढली असती. जर एखाद्या गुंतवणूकदारानं या वर्षी जानेवारीमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचं मूल्य आज 11.47 लाख रुपये झालं असतं.
(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)