Lokmat Money >शेअर बाजार > ६ महिन्यांमध्ये १७६६% रिटर्न, ₹२,७० वरुन ₹५०.४० वर आला हा शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट

६ महिन्यांमध्ये १७६६% रिटर्न, ₹२,७० वरुन ₹५०.४० वर आला हा शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ उतार दिसून येत आहेत. परंतु असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या ग्राहकांना उत्तम परतावा दिलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 03:50 PM2024-04-09T15:50:01+5:302024-04-09T15:50:58+5:30

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ उतार दिसून येत आहेत. परंतु असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या ग्राहकांना उत्तम परतावा दिलाय.

Multibagger Penny Stock Viceroy Hotels 1766 percent return in 6 months share from rs 2 70 to rs 50 40 The upper circuit continues | ६ महिन्यांमध्ये १७६६% रिटर्न, ₹२,७० वरुन ₹५०.४० वर आला हा शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट

६ महिन्यांमध्ये १७६६% रिटर्न, ₹२,७० वरुन ₹५०.४० वर आला हा शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट

Multibagger Penny Stock Viceroy Hotels: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ उतार दिसून येत आहेत. परंतु असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या ग्राहकांना उत्तम परतावा दिलाय. एक असाही स्टॉक आहे ज्यानं अवघ्या सहा महिन्यांत 1 लाख रूपयांचे 18.66 लाख रुपये केले आहेत. हा शेअर आताही गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शेअरला अपर सर्किट लागत आहे. व्हाईसरॉय हॉटेल्स लिमिटेड असं या स्टॉकचं नाव आहे. आज हा स्टॉक 5 टक्के अपर सर्किटसह 50.40 रुपयांवर पोहोचला असून हा याचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. कंपनीची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1.75 रुपये आहे.
 

318.32 कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेली ही कंपनी पूर्वी पॅलेस हाइट्स हॉटेल्स (PHHL) म्हणून ओळखली जात होती. 1965 मध्ये व्हाईसरॉयमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. पी प्रभाकर रेड्डी हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 2007 मध्ये हा स्टॉक 128 रुपयांच्या आसपास होता. 2019 पर्यंत त्याची किंमत 1.35 रुपये राहिली. 2020 च्या सुरुवातीला त्याची किंमत एक रुपयापेक्षा कमी होती.
 

19 ऑक्टोबर 2023 रोजी तो 3.60 रुपयांवर पोहोचला. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. 3 एप्रिल 2024 रोजी शेअर 41.55 रुपयांवर पोहोचला. या महिन्यात सततच्या अप्पर सर्किटमुळे व्हाईसरॉय हॉटेल्सच्या शेअरची किंमत 50.40 रुपयांवर पोहोचली. गेल्या एका वर्षात त्यात 2244 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

Web Title: Multibagger Penny Stock Viceroy Hotels 1766 percent return in 6 months share from rs 2 70 to rs 50 40 The upper circuit continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.