Join us

Multibagger Raymond Share : २२० रुपयांचा शेअर १२०० पार, ४५६ टक्क्यांनी वाढला या कंपनीचा शेअर; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:35 PM

कपडे तयार करणाऱ्या या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिले आहेत. 

मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये (Multibagger Stock) गुंतवणूक करणं तसं धोकादायक आहे. परंतु हे शेअर आपल्या गुंतवणूकादारांना मोठे रिटर्नही देतात. असाच एक स्टॉक आहे तो म्हणजे रेमंड (Raymond) या कंपनीचा. या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिलाय. रेमंड हा जगभरातील कपड्यांचा लोकप्रिय ब्रँड आहे. या स्मॉल कॅप स्टॉकनं अल्पावधीतच गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. गेल्या तीन वर्षांत, रेमंडच्या स्टॉकनं त्यांच्या गुंतवणूकदारांना ४०० टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.

मात्र, मंगळवारीही रेमंडच्या शेअर्समध्ये घसरण झाली. कामकाजादरम्यान तो ४.०१ टक्क्यांच्या घसरणीसह १,१७३.९० वर बंद झाला. रेमंडच्या शेअरनं जवळपास तीन वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल ४५६ टक्के नफा मिळवून दिला आहे. तर या शेअरनं गेल्या सहा महिन्यांत १८ टक्क्यांचा परतावा दिला आहे. त्याच वेळी, या स्टॉकने एका वर्षात ६७ टक्क्यांनी झेप घेतली आहे.

लाँच टर्ममध्ये तुफान नफारेमंडच्या समभागांनी दीर्घ मुदतीतही गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न दिले आहेत. गेल्या २० वर्षांत शेअरनं १२०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिलाय. रेमंडनं तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ४५६ टक्के परतावा दिला आहे. एप्रिल २०२० मध्ये, त्यांच्या शेअरची किंमत २२० रुपये होती. सद्यस्थितीत ते १२०० रुपयांच्या आसपास आहे. सोमवारी तो ११२९ रुपयांच्या जवळ बंद झाला होता. या स्टॉकचा ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १,६६४ रुपये आहे आणि नीचांकी पातळी ७१६.३५ रुपये आहे. तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना जवळपास पाच पट नफा मिळवून दिलाय.(टीप - बातमीत केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा