Multibagger Share : सध्या कंपन्या त्यांचे तिमाही निकाल शेअर बाजारात (Stock Market) जाहीर करत आहेत. या निकालांसोबतच काही कंपन्यांकडून बोनस शेअर्सही जाहीर केले जात आहेत. स्मॉलकॅप कंपनी Zim Laboratories Ltd ने त्रैमासिक निकालांसह बोनस शेअर्सही जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (Q2 Result) कंपनीच्या विक्रीत वार्षिक 31.08 टक्के वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा 182.50 टक्क्यांनी वाढून 5.65 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर बोनस म्हणून 2 शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.
"10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या एका शेअरवर, गुंतवणूकदारांना कंपनीच्या वतीने 2 बोनस शेअर्स दिले जातील,” अशी माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली. परंतु Zim Laboratories Ltd ने अद्याप या बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. या वर्षी कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 163 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शुक्रवारीही झाली वाढशुक्रवारी कंपनीच्या शेअरचा भाव 0.06 टक्क्यांनी वाढून 313.50 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात शेअर्सच्या किमतीत 26.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या शेअरची किंमत 198.65 रुपयांवरून 313.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 57.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभराबाबत बोलायचे झाले तर शेअरचे भाव दीडशे टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 509.10 कोटी रुपये आहे.
(टीप - यामध्ये कंपनीच्या शेअर बद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घ्यावा.)