Join us  

Multibagger Share : २० पैशांच्या शेअरची कमाल, पोहोचला ६५₹ वर; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ३ कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 3:07 PM

Multibagger Share : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे.

Multibagger Share : शेअर बाजारातील घसरणीनंतरही असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. बाजारातील घसरणीदरम्यानही या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. हे शेअर्स (Raj Rayon Industries) अजूनही तेजीत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगत आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. ज्यांनी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले ते अवघ्या दोन वर्षांत कोट्यधीश झालेत.

राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या (Raj Rayon Industries) शेअरनं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरनं सातत्यानं गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या शेअरनं रॉकेट स्पीड पकडलाय. गेल्या एका वर्षात या शेअरनं 3700 टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. 

2 वर्षांपूर्वी 20 पैशांवरदोन वर्षांपूर्वी म्हणजेच 26 मार्च 2021 रोजी राज रेयॉन इंडस्ट्रीजचे शेअर्स BSE वर फक्त 0.20 रुपयांच्या किमतीत होते. तर आज म्हणजेच 29 मार्च 2023 रोजी शेअरची किंमत 65.20 रुपयांपर्यंत वाढली आहे. दोन वर्षांत या शेअरची किंमत सुमारे 33 हजार टक्क्यांनी वाढली आहे. सहा महिन्यांपूर्वी हा शेअर 16 रुपयांवर व्यवहार करत होता. या दरम्यान, त्याने गुंतवणूकदारांना 300 टक्के बंपर परतावा दिला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून स्टॉक 80.22 टक्क्यांनी वाढला आहे. अशा प्रकारे  जर कोणी 2 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि गुंतवणुकदाराने आत्तापर्यंत स्टॉक ठेवला असता तर त्याला 3.7 कोटी रुपयांचा बंपर परतावा मिळाला असता. एखाद्यानं वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचं मूल्य 38 लाख रुपये झालं असतं. ही पॉलिएस्‍टर यार्न बनवणार्‍या देशातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे.

(टीप - यात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक