Join us  

Multibagger Share : ८ पैशांच्या शेअरनं १ लाखाचे केले ९.२६ कोटी, एक्सपर्ट म्हणाले….

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 4:29 PM

जर एखाद्या गुंतवणूकदाराने आत्तापर्यंत या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्या एक लाखाचे मूल्य आज ९.२६ कोटी रुपये झाले असते.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनलचे शेअर्स येत्या काही दिवसांत सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 41 टक्के परतावा देऊ शकतात. हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावरून सुमारे 42 टक्के डिस्काऊंटवर आहे. 18 जानेवारी 2023 रोजी मदरसन प्रमोशनचा शेअर 74.20 रुपयांवर बंद झाला होता. 1 जून 1999 रोजी हा शेअर केवळ 8 पैशांवर होता. तेव्हापासून आतापर्यंत या शेअरने 92560 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आत्तापर्यंत या शेअरमध्ये 100000 रुपये प्रति शेअर 8 पैसे या दराने गुंतवले असतील तर त्याच्या एक लाखाचे मूल्य 9.26 कोटी रुपये झाले असते. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 127.57 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 61.80 रुपये आहे.

BNP पारिबाने या शेअरच्या खरेदीचा सल्ला दिला आहे. कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल 7 फेब्रुवारीला येऊ शकतात. बीएनपीचा असा विश्वास आहे की कमोडिटीच्या किमती नरमल्याचा कंपनीच्या मार्जिनवर परिणाम होईल आणि एकत्रित महसूल वाढण्याची अपेक्षा आहे.

ब्रोकरेज हाऊसने संवर्धन मदरसनने स्टॉकचे रेटिंग 103 रुपयांवरून 105 रुपये केले आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर सुमारे 39 टक्क्यांनी घसरला आहे, तर गेल्या 5 वर्षांत तो 56 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. BNP व्यतिरिक्त, 19 पैकी 9 विश्लेषकांनी यावर क्विक बायची शिफारस केली आहे, तर 5 ने बाय रेटिंग दिले आहे. तर, 3 विश्लेषकांनी होल्ड करण्यास सांगितले आहे आणि दोघांनी स्टॉकमधून बाहेर पडण्यास सांगितले आहे.

(टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक