Multibagger penny stock: पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असले तरी कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असतील तर गुंतवणूक करता येते. आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअरबद्दल सांगत आहोत, ज्यानं अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या शेअरचे नाव आहे कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड (Kaiser Corporation). हा या वर्षातील संभाव्य मल्टीबॅगर स्टॉकपैकी (Multibagger stocks) एक आहे. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरच्या किमतीने गेल्या एका वर्षात 20,541 टक्क्यांपेक्षा जास्त स्टॉक रिटर्न्स Stock Return) दिले आहेत.
39 पैशांचा होता शेअर
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचे शेअर्स 22 सप्टेंबर 2021 रोजी BSE वर 39 पैसे प्रति शेअर या पातळीवर होते. हे शेअर आता एका वर्षात 80.50 रुपये (19 ऑगस्ट 2022 BSE वर बंद किंमत) पर्यंत वाढले आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20,541.03 टक्क्यांचे मजबूत रिटर्न्स दिले आहेत. त्याच वेळी, गेल्या सहा महिन्यांत, हा स्टॉक 15.65 रुपयांवरून (22 फेब्रुवारी 2022 रोजी बंद किंमत) वरून 80.35 रुपयांपर्यंत पर्यंत वाढला आहे.
या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 414.38 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. त्याचप्रमाणे, यावर्षी 2,656.85 टक्क्याचे रिटर्न दिले आहेत. 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2.92 रुपयांवर होते. मात्र, गेल्या एका महिन्यात हा शेअर 3.71 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरच्या किंमतीत 19.52 टक्क्यांची वाढ झाली आहे.
वर्षभरात गुंतवणूकदार कोट्यधीशकैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर प्राइस पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये वर्षभरापूर्वी 39 पैसे दराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आतापर्यंत त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज या रकमेचे मूल्य 2 कोटी झाले असते. त्याचप्रमाणे या वर्षी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपये 2.92 रुपये प्रति शेअर या दराने गुंतवले असते, तर आज या रकमेचे मूल्य 27.56 लाख रुपये झाले असते.(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)